Breaking News LIVE : परमबीर सिंह यांना तूर्तास अटक करू नका, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
Breaking News LIVE Updates, 21 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
परमबीर सिंह यांना तूर्तास अटक करू नका, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, रात्रा 12 वाजता न्यायमूर्ती काथावाला यांनी कामकाज थांबवलं, प्रकरणाची सुनावणी अपूर्ण राहिल्यानं परमबीर यांना तूर्तास अटकेपासून दिलासा, सोमवारी सकाळी 10 वाजता पुन्हा घेणार सुनावणी
न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या कोर्टात एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा 12 तासांचं मॅरेथॉन कामकाज,
इतकं उशिरापर्यंत कामकाज चालवल्याबद्दल आमच्यावर टिकाही होते. परंतु त्याच झाडावर दगड मारले जातात ज्या झाडावर फळं लागतात - न्या. काथावाला
राज्यात आज 44,493 रुग्णांना डिस्चार्ज तर 29,644 नवीन कोरोना रुग्णांचं निदान, आज राज्यात 555 कोरोनाबाधितांचा मृत्यू
नाशिकचा कडक लॉकडाऊन 23 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार, 24 तारखेपासून राज्य सरकारच्या ब्रेक दि चेन चे निर्बंध कायम राहणार, जिल्ह्यातील बाजार समिती, औद्योगिक कंपन्या सोमवार पासून सुरू होणार, पालकमंत्री छगन भुजबळ आणि अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीतील निर्णय, 12 तारखेपासून 23 पर्यंत जिल्ह्यात लागू आहे कडक लॉकडाऊन, कोरोना रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी झाल्याने नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा आहे. 'ब्रेक द चेन' अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत 48 लाखांहून अधिक नागरिकांनी नि:शुल्क जेवणाचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण झालं आहे.
कोल्हापुरातील एका तरुणाने 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' सिनेमा स्टाईलने दंडाची रक्कम भरली. इचलकरंजी इथे हा प्रकार घडला. कोरोनाविषयक नियम मोडल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या तरुणाला 500 रुपयांचा दंड ठोठावला होता. हा पाचशे रुपयांचा दंड भरण्यासाठी तरुणाने 5 रुपयांची नाणी आणली.
लसीकरण विषय हे केंद्रांनी स्वतःकडे ठेवला आणि जेव्हा त्यांना वाटलं की आपण हे करू शकत नाही तेव्हा त्यांनी सांगितले की राज्याने विकत घ्यावे. हाच विषय तेव्हाच सांगितलं असतं तर राज्य तेव्हाच तयारी करून ठेवली असती.हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय केला आहे.. टास्क फोर्सने सांगितले तरीही लसीकरण पुरवठा होत नाहीये त्यामुळे आता दोष लसी देणाऱ्यांचा आहे हे स्पष्ट आहे अशी केंद्रावर टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलीय.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील बाळ बोठेचा आणखी एक कारनामा, पारनेरच्या कारागृहात मोबाईल वापरल्याची बाब उघड. बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोवा कोर्टाचा दिलासा. बलात्काराच्या आरोपांतून तरुण तेजपाल यांनी निर्दोष मुक्तता
नाशकात कडक लॉकडाऊन मध्येही घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी चोपले. अत्यावश्यक सेवेशिवाय भटकणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद. शटर बंद ठेवून दुकान हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांना चोपले. 12 ते 23 मे पर्यंत शहरात कडक लॉकडाऊन, केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर फिरण्याची परवानगी. नियम, आदेश धुडकावून नागरिक रस्त्यावर त्यामुळं लॉकडाऊन च्या शेवटच्या टप्यात पोलिस पुन्हा आक्रमक
रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कारागृहात बोठेकडून मोबाईलचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पारनेर कारागृहात मोबाईल सापडले होते. त्याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता बोठेने देखील मोबाईल वापरल्याचे समोर आलं आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ते देवगड आणि आचरा भागात वादळात झालेल्या नुकसांनीची पाहणी करणार आहेत.
पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पाच्या सोडतीला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. एकूण 4883 घरांची आज सोडत होत आहे. "महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक लॉटरी आपण काढल्या आहेत. आजच्या लॉटरीत ज्यांना घर लागणार नाही त्यांनी निराश होऊ नका. पुढच्या टप्प्यात आपण 6309 घरांची लॉटरी काढणार आहोत. 2022 पर्यंत सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. पिंपरीशी माझं वेगळ्या प्रकारचं नातं आहे," असं यावेळी अजित पवार म्हणाले.
इंदापूर तालुक्यात आज विविध ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन केले जाणार आहे. उजणीतून इंदापूर तालुक्याला मिळणाऱ्या 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मागे घेतल्याने हे सर्वपक्षीय आंदोलन केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे दुकानांना भीषण आग लागलू असून त्यामध्ये आठ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. एसटी स्टँड समोरील स्वीट मार्ट दुकानाला रात्री साडे बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याने ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली आहे.
पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, चकमकित आठ ते दहा माओवादी ठार झाल्याचा अंदाज. गडचिरोली पोलिसांना मोठं यश. एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलातील घटना, गडचिरोली पोलिसांचे सी-60 च्या कमांडो जवान या भागात राबवित होते नक्षल विरोधी अभियान, या भागात कसनसुर नक्षल दल कार्यरत असल्याची माहिती
इंधन दरवाढीचे सत्र सुरुच आहे. परभणीत आज पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 30 पैशांनी वाढले आहे. परभणीतील आजचे पेट्रोलचा दर 101.71 रुपये असून डिझेल 91.92 रुपयांवर पोहोचलं आहे.
बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन मॉर्निंग वॉक करणाऱ्यांविरोधात आज सकाळी शेगाव पोलिसांनी मोहीम उघडली. आज मॉर्निंग वॉक करणाऱ्या 18 जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकवर बंदी असतानाही शेगाव-खामगाव महामार्गावर नागरिक आल्याने ही कारवाई करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यात आजपासून पुन्हा लसीकरण केंद्रे बंद राहणार आहे. याआधी 17,18,19 मे रोजी लसीकरण केंद्रे बंद होती. तर 20 तारखेला एका दिवसात जिल्ह्याला मिळालेल्या 7 हजार 600 लसीचा वापर झाला. काल ज्येष्ठ नागरिकांनी पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभं राहून लसी घेतल्या, पण बऱ्याच नागरिकांना निराश होऊन परतावं लागलं. आज पुन्हा लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध राहणार नाही. लस उपलब्ध झाल्यावर कळवण्यात येईल, असं स्पष्टीकरण महापालिकेकडून देण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यात रुग्णांची संख्या पाहून तरी लसीकरणाचा साठा शासनाने वाढवून पाठवण्याची मागणी अमरावतीकरांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली येथील जंगल परीसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. ही घटना समोर आल्यानंतर वन्यजीवप्रेमीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील बिबट्याची शिकार होत असल्याचा आरोप होत आहे. वनविभागाकडून बिबट्याचा मृत्यू कसा झाला, की त्याची शिकार झाली याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान मृत बिबट्यावर वनविभागाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यात एक आठवड्यापासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे कर्नाटकचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी बेळगावला भेट देऊन शासकीय विश्रामगृहात कोरोना नियंत्रणासंबंधी बैठक घेतली. बैठकीला प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस आणि आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मुख्य सचिव पी.रविकुमार यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरला भेट दिली आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. भेटीच्या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बेळगावातील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी करुन सूचना केल्या. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या संचालकांकडून घेतली. याशिवाय कोविड वॉर सेंटर, वंटमुरी येथील मदर चाईल्ड हॉस्पिटल, सुभाषनगर इथे सुरु करण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरलाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान विश्वास, जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन, पोलीस आयुक्त त्यागराज न, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी होते.
तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज,शुक्रवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. तोक्ते चक्रीवादळमुळे कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात त्यांच्या या दौऱ्यास सुरुवात होत आहे.
पार्श्वभूमी
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा
तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज,शुक्रवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. तोक्ते चक्रीवादळमुळे कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात त्यांच्या या दौऱ्यास सुरुवात होत आहे.
गुरुवारी राज्यात 47,371 रुग्ण बरे होऊन घरी तर 29,911 नवीन रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 47371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 5026308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.43% एवढे झाले आहे.
NEGVAC नं 1 जूनपर्यंत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत निर्णय घ्यावा : हायकोर्ट
मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा केली, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास बीएमसी तयार आहे मात्र केंद्र सरकारनं त्यासाठी नियमावली जारी करण्याची गरज आहे. अशी भूमिका गुरूवारी मुंबई पालिकेच्यावतीनं हायकोर्टात व्यक्त केली. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी त्याप्रमाणात लसींचा साठा सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही असंही पालिकेनं हायकोर्टात सांगितलं. मात्र हे यासाठीच कारणच असू शकत नाही, कारण लसींचा साठा कमीय म्हणून लसीकरणच बंद आहे का?, ते साठ्यानुसार सुरूचं आहे तर मग त्याच प्रमाणात घरोघरी जाऊन काही व्यक्तींना लस द्यायला काय हरकत आहे?, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. दरम्यान यासंदर्भात 'नेगवॅक' ला 1 जूनपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश बुधवारी हायकोर्टानं देत यासंदर्भातील सुनावणी 2 जूनपर्यंत तहकूब केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -