Breaking News LIVE : राज्यात आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

Breaking News LIVE Updates, 11 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 May 2021 08:06 PM
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. 

पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. 

मराठा समाजाला उल्लू बनवणे या सरकारने थांबवावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मराठा समाजाला उल्लू बनवणे या सरकारने थांबवावे, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मराठा समाजाची दिशाभूल करण्याची हास्यास्पद कृती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, गेले सहा महिने राज्यपालांना शिव्या दिल्या आणि आता नम्रपणे निवेदन द्यायला गेले

राज्यात आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

दिलासादायक! राज्यात आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त. आज 71 हजार 966 रुग्णांना डिस्चार्ज तर 40 हजार 956 नवे कोरोनाबाधित.

Corona Update | मुंबईत आज 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 6082 रुग्णांना डिस्चार्च, सध्या मुंबईत 41 हजार 102 रुग्ण

Corona Update | मुंबईत आज 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 6082 रुग्णांना डिस्चार्च, सध्या मुंबईत 41 हजार 102 रुग्ण

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्ट निकालाचा अभ्यास करायला आठ सदस्य समितीची स्थापना

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्ट निकालाचा अभ्यास करायला आठ सदस्य समितीची स्थापना, दिलीप भोसले माजी मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती, समितीला 31 मे पर्यंत अभ्यास करून अहवाल द्यायचा आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला काँग्रेसचे मंत्री 'वर्षा'वर दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला काँग्रेसचे मंत्री 'वर्षा'वर, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, सतेज पाटील, सुनील केदार, विजय वड्डेटीवार,भाई जगताप वर्षा बंगल्यावर पोहोचले

बारामती शहरासह तालुक्यातील लॉकडाऊन 7 दिवसांनी वाढवला

बारामती शहरासह तालुक्यातील लॉकडाऊन 7 दिवसांनी वाढवला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने बारामती प्रशासनाचा निर्णय. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार. भाजीपाला आणि किराणा घरपोच पोहोचवण्यास प्रशासनाची परवानगी. 12 ते 18 तारखेपर्यंत असणार बारामतीत कडक लॉकडाऊन.

15 तारखेनंतर दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्या, फेडरेशन ऑफ रिटेलर्स ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे विरेन शहा यांची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

15 तारखेनंतर दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्या, फेडरेशन ऑफ रिटेलर्स ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे विरेन शहा यांची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता

दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता, उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता. 14 मे रात्री पासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा. मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी सूचना : हवामान विभाग

बेळगावात बॅरिकेड्समुळे रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही माघारी फिरावं लागतंय
लॉकडाऊनमुळे बेळगाव शहरातील अनेक मार्गावर बॅरिकेड्स लावल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील पुन्हा फिरुन माघारी जावे लागत आहे. रस्त्यावर वाहतूक होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. शहरातील दोन भागांना जोडणारे ब्रीजही पोलिसांनी बंद केले असून त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. कोरोना रुग्ण आणि अन्य रुग्णांना रुग्णवाहिकेतून दुसऱ्या हॉस्पिटलमधे उपचारासाठी नेले जाते. पण शहरातील अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केल्यामुळे रुग्णवाहिकाही पुन्हा वळून दुसऱ्या रस्त्याने जात आहेत. रस्ते बंद असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी वेळ लागत असून त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची धाकधूक वाढत आहे.
18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठीचं लसीकरण कमी वेगानं केलं जाण्याची शक्यता- राजेश टोपे

लसीकरणाच्या मोहिमेत लसींच्या तुटवड्यामुळे 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्यस्थानी ठेवण्यात येत आहे. याचा परिणाम 18 ते 44 वयोगटातील लसीकरणावर होत आहे. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर काही दिवसांसाठी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठीचं लसीकरण कमी वेगानं करण्याचा निर्णय उद्याच्या कॅबिनेट बैठकीत होईल 

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी कोविड सेंटरसाठी सुप्रिया केमिकल कंपनीचा पुढाकार

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ती आटोक्यात येण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील सुप्रिया लाईफसन्स कंपनीचे आज दोन अद्यावत कोविड सेंटर सुरु करण्यात आले. याचा फायदा लोटे एमआयडीसी आणि परिसरातील गावांना होऊ शकणार आहे. कंपनीचे मालक सतीश वाघ यांनी कोविड सेंटरसाठी 50 लाखांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे प्रशासनकडून कौतुक होत आहे. त्याचे उद्घाटन माजी मैत्री सध्याचे गुहागर खेड मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते पार पडले. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ती आटोक्यात आणण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत आणि प्रशासनाला साथ देत आहेत. त्यातच नव्याने लोटे एमआयडीसीमधील सुप्रिया लाईफसन्स कंपनीने पाऊल उचलले आहे. खेडमध्ये एक नव्हे तर दोन अद्यावत कोविड सेंटर सुरु होत आहेत. यामध्ये हॉटेल वक्रतुंड इथे व्हेंटिलेटरसह सुसज्ज 30 आयसीयू बेड आणि  परशुराम हॉस्पिटल ऑक्सिजन पुरवठा असलेल्या 30 बेड घाणेखुंट लोटे येथे आजपासून सुरु झाले. 

आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातून मदत

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाचा वाढत कहर पाहून भाळवणी इथे तब्बल 1100 बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. शरदचंद्र पवार साहेब आरोग्य मंदिर नावाने हे कोविड सेंटर सुरु केले असून या कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत आहे. विशेष म्हणजे या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे. आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे.  कोरोनाच्या काळात आपण लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांची सेवा करत असून केवळ रुग्ण बरे व्हावे हा एकमेव उद्देश असल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली.

नांदेडमध्ये लॉकडाऊन असतानाही बाजारपेठेत तोबा गर्दी

नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन आहे. परंतु हा लॉकडाऊन फक्त नावालाच असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुदखेड, नांदेड जिल्ह्यातील बाजार पेठेतील दुकानं लॉकडाऊन दरम्यानही पूर्ण क्षमतेने उघडून तोबा गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला खरेदी, साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत मोठी गर्दी करत असून कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा मोठया संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोना नियम न पाळणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर

निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर. आरएफओ दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. स्वत:विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा रेड्डी यांचा दावा

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ. पोलीस निरीक्षक घाडगे आणि एपीआय अनुप डांगे यांच्याकडून परमवीर सिंह यांच्याविरोधात तक्रार

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू आणि बुद्धीबळ पंच उमेश पानबुडेंचा कोरोनामुळे मृत्यू 

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू आणि बुद्धीबळ पंच उमेश पानबुडेंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 48 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बुद्धीबळ क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. उमेश पानबुडे यांना 27 एप्रिलला कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी विदर्भात अनेक युवा बु्ध्दीबळपटू घडवले होते. खासकरून झोपडपट्टीतील मुलांना बुद्धीबळांची आवड  निर्माण केली आणि त्यांच्यांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले होते

नांदेड:लॉक डाऊन असतानाही नांदेड जिल्ह्यातील बाजारपेठेत तोबा गर्दी

नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पाश्वभूमीवर कडक लॉक डाऊन आहे,परंतु हे लॉक डाऊन फक्त नावालाच असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील देगलूर,मुदखेड,नांदेड जिल्ह्यातील बाजार पेठेतील दुकाने लॉक डाऊन दरम्यानही पूर्ण क्षमतेने उघडुन तोबा गर्दी होत असल्याचे चित्र आहे.त्याच प्रमाणे भाजीपाला खरेदी, साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत मोठी गर्दी करत असून त्या दरम्यान कोणतेही कोरोना नियम पाळल्या जात नाहीयेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा मोठया संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोना नियम न पाळणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेयत.

कोरोनाच्या महत्वपूर्ण काळात सेवा देणाऱ्या BAMS डॉक्टर काम बंद करण्याच्या तयारीत

कोरोनाच्या महत्वपूर्ण काळात सेवा देणाऱ्या BAMS  डॉक्टर काम बंद करण्याच्या तयारीत. MBBS  डॉक्टरांच्या नवीन नियुक्तीमुळे BAMS डॉक्टरांची सेवा समाप्तीचे आदेश. जिल्ह्यात 67 तर राज्यात 835 BAMS  डॉक्टरांची सेवा समाप्ती. गरज सरो वैद मरो अशी सरकारची भूमिका असल्याची डॉक्टरांची भावना

अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत अनिल देशमुखांवर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. 

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र,

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण देण्यासाठी केंद्राने योग्य पावलं उचलण्याची विनंती

देशातील कोरोना रुग्णसंख्येची स्थिती

गेल्या 24 तासात देशात 3,29,942 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासात 3,56, 082 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत तर 3,876 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

डॉ. अजय डवले यांना आणि कुटुंबियांना संरक्षण द्या: राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

आमदार रणजित कांबळे शिवीगाळ प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली असून तशा प्रकारचे पत्र महासंघाने मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना लिहिले आहे. तसेच अधिकारी डॉ. अजय डवले यांना आणि कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणीही केली आहे. 

औरंगााबादमध्ये लसीकरणाचे नियोजन बिघडले, केंद्रासमोर भल्यामोठ्या रांगा

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. एकीकडे लग्नाला पंचवीस माणसे जमवले तर गुन्हा दाखल होतो मात्र, दुसरीकडे लसीकरणाच्या कार्यक्रमाचे नियोजन शून्य आहे. त्यामुळे शेकडो लोक सोशल डिस्टंसिंग न पाहता लाईन मध्ये उभे असतात. शंभर -दीडशे लसी येतात मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर चारशे-पाचशे लोक लाईन मध्ये उभे राहतात. काही जणांना लस न मिळाल्याने पुन्हा घरी जावं लागतं...

नागपूरच्या फरार कैद्याला अटक करण्यात पोलिसांना यश

नागपुरातील टीबी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 42 मधून तिथे उपचार घेणारा एक कैदी पहाटे फरार झाला होता. कृष्णा हरिदास डांगरे असे त्याचे नाव असून तो टीबी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 42 मध्ये उपचार घेत होता. या फरार कैद्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपूरच्या बाहेर निघण्याच्या प्रयत्नात असताना आज सकाळी त्याला पोलिसांनी अटक केली. 

आमदार रणजीत कांबळे यांच्यावर वर्ध्यात गुन्हा दाखल

आमदार रणजीत कांबळे यांच्यावर वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना फोनवर शिवीगाळ त्यांना महागात पडली आहे. डॉ. डवले यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा अधिनियम तसंच कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नागपुरातील टीबी रुग्णालयात उपचार घेणारा बलात्काराचा कैदी पसार, पोलिसांकडून शोध सुरु

नागपुरातील टीबी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 42 मधून तिथे उपचार घेणारा एक कैदी पहाटे पसार झाला आहे. कृष्णा हरिदास डांगरे असे त्याचे नाव असून तो 376 म्हणजेच बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषी असून 2017 पासून तुरुंगात होता. तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे रुग्णालयातील कोणाचीही नजर त्याच्यावर नाही याचा फायदा घेत तो पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात अपघात , एकाचा मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात अपघात , एकाचा मृत्यू. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ट्रेलरची टेम्पोला धडक. ट्रेलर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पोला धडक. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रेलरची धडक..

लातूरमध्ये ईदसाठी काहीशी शिथिलता, 11 आणि 12 तारखेला सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत खरेदीसाठी मुभा

मुस्लीमांच्या पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी येणाऱ्या ईदच्या सणासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने आठ दिवसांसाठी कडक निर्बंध लादले होते. मात्र ईद सणासाठी काही प्रमाणात यात शिथिलता देण्यात आली आहे. ती ही 11 आणि 12 तारखेला असणार आहे. या दोन दिवशी ईद सणासाठीच्या खरेदीला सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर जाता येईल. यात फळ, भाजीपाला, किराणा, सुक्यामेव्याची दुकाने यांचा समावेश आहे तर मांस विक्रीची दुकानं हे 11 आणि 12 तारखेला सकाळी आणि 12 आणि 13 तारखेला संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत सुरु राहतील. चंद्र दर्शन झाल्यास 13 तारखेला संध्याकाळी पाच ते सात ही सगळी दुकाने उघडी असतील. नागरिकांनी गर्दी न करता त्याच्या घरापासून जवळच्या बाजारातच खरेदी करावी, मुख्य बाजारपेठेत गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आलं आहे. फळ आणि भाजीपाल्याच्या व्यापाऱ्यांनी गाड्यावर फिरत व्यवसाय करावा. एका ठिकाणी जास्त काळ गर्दी करु नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जालना-दोन गटात दगडफेक, पोलिसांचा हवेत गोळीबार

जालना शहरात रात्री  दोन गटात जुन्या वादातून दगडफेक झाली ,यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, रात्री शहरातील  काद्राबाद आणि दर्गा वेस भागात जुन्या भांडणा मधून दोन गट एकमेकांसमोर भिडले आणि त्यातून एकमेकांवर तुफान दगडफेक सुरू झाली यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत ,जमावाला पांगवण्यात यश मिळवलं या वेळी झालेल्या झटापटीत दोन पोलीस जखमी झालेत, तर या प्रकरणी 27 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय

पार्श्वभूमी

राज्यात लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र तरीही रोज जवळपास 40-50 हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन आता 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 15 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. 


मोठा दिलासा! राज्यात सोमवारी 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 37,326  रुग्णांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे. 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आज राज्यापालांची भेट घेणार!
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (11 मे) संध्याकाळी पाच वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे, ते पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत सांगितलं होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता हा मुद्दा थेट राष्ट्रपतींकडे मांडत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.