Breaking News LIVE : Breaking News LIVE : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण उद्या राज्यपालांची भेट घेणार
Breaking News LIVE Updates, 10 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर सदस्य उद्या राज्यपालांची भेट घेणार, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यामुळे हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून मिळू शकते, त्यामुळे राज्यपालांना भेटून निवेदन देणार, संध्याकाळी पाच वाजता होणार भेट
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या चौकशी समितीबाबत निर्णय, निवृत न्यायाधीश कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांना मिळणार उच्च न्यायलयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे वेतन आणि भत्ते इतके मानधन मिळणार, उच्चस्तरिय चौकशी समितीचे वकील अॅडवोकेट शिशिर हीरे यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी दिवसाचे 15 हजार इतके मानधन मिळणार, भैया साहेब बोहरे ( समितीचे प्रबंधक) , सुभाष शिखरे ( समितीचे शिरस्तेदार) हर्षवर्षंन जोशी (समितीचे लघुलेखक ) संजय कार्णिक ( कार्यालयीन अधीक्षक दंडाधिकारी )
बदलापूर शहरात लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा लॉकडाऊन अखेर रद्द, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले नवीन आदेश, आता पूर्वीप्रमाणे सकाळी 7 ते 11 सगळी दुकानं सुरू राहणार, तर त्यानंतर अत्यावश्यक दुकानं सुरू राहणार, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती, त्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊन मागे घेतला
लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती, अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती जैसे थे, 31 मेपर्यंत हेच निर्बंध कायम राहण्याची शक्यता, अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर वाढताना दिसतोय, त्यामुळं लॉकडाऊन कायम राहणार
मोठा दिलासा...! आज राज्यात 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली पद मुक्त, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित, नेपाळमधील कम्युनिस्ट पार्टीचं सरकार बरखास्त
महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय, 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत, शासकीय अध्यादेश जाहीर ,
सर्वसाधारण बदल्या तसेच अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणांमुळे करावयाच्या बदल्या करण्यात येणार नाही
मुंबई : मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचं होणार लसीकरण, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित, मंत्रालयात 12 ते 25 मे पर्यंत कामकाजाच्या वेळेत सकाळी 10 ते 5 या वेळेत होणार लसीकरण, लसीकरणासाठी खास कॅम्प आयोजित करण्यात येणार
नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय, नाशिक शहरासह जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठकीत घेतला निर्णय
पंढरपुरात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने विविध संस्था, डॉक्टर आणि राजकीय मंडळी पुढे येऊन कोवि़ड हॉस्पिटलची उभारणी करू लागले असून आज मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे आणि पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी 150 बेडच्या पल्स हॉस्पिटलचा शुभारंभ केला . नदीच्या पलीकडे भटुंबरे गावाजवळ असलेले हे हॉस्पिटल शेतात असल्याने रुग्णांना भरपूर मोकळी हवा व निसर्गरम्य वातावरण मिळणार आहे . या हॉस्पिटल मध्ये 50 ऑक्सिजनाचे बेड असून 100 त्रास नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर असणार आहे . आज या पल्स हॉस्पिटलचे उदघाटन करण्यात आले आहे .
पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरमध्ये कोरोनाने सुरुवात केल्याने सध्या प्रचंड दहशत असून दिवसाही शहर व तालुक्यात स्मशान शांतता अनुभवायला मिळत आहे . सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध लावल्याने औषध दुकाने वगळता सर्व आस्थापना व दुकाने , बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने कसलीच वाहतूक रस्त्यावर दिसत नाही. चौकाचौकात पोलीस उभे असल्याने दवाखान्याच्या आलेल्यांचीही तपासणी केली जात असून मोकाट फिरणाऱ्यांवर केली जात आहे . सध्या शहरात २६०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून परिस्थिती दिवसेंदिवस खराब होऊ लागल्याने नागरिकांच्या मनातही आता कोरोनाची प्रचंड धास्ती बसली आहे . त्यामुळे प्रशासनाचे काम हलके झाले असून शहर व तालुक्यातील रस्ते मोकळे पडले आहेत .
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे 2004 सालापासून पदोन्नती रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. आज तसा आदेश जारी करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज औरंगाबादच्या भडकल घट परिसरात डॉ .बाबासाहेब आंबेदकर यांच्या पुतळ्या समोर आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आलं.या आंदोलन आंदोलन कर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वोरोधात गोषणाबाजी केली.हा आदेश मागे घेण्यात यावा अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे
नांदेड जिल्ह्याला केंद्र सरकार कडून एकूण 168 व्हेंटिलेटर मिळाले असून जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांना 80 व्हेंटिलेटर तर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयाला 88 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. त्यापैकी जिल्हा परिषद व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर पैकी 7 व्हेंटिलेटर नादुरुस्त तर शासकीय रुग्णालयातील 3 असे एकूण 10 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हैसेकर यांनी दिलीय.परंतु जिल्ह्यातील एकूण व्हेंटिलेटर ,केंद्राने पाठवलेले व्हेंटिलेटर व नादुरुस्त व्हेंटिलेटर याविषयी अधिकृत बाईट देण्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी नकार दिलाय.
टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला आणखी एक धक्का बसला आहे. जपान मध्ये झालेल्या सर्वेक्षणानंतर असे दिसून आले आहे की, जपानमधील जवळपास 60% लोकांनी
हे खेळ होवू नयेत असे मत व्यक्त केले आहे. कोविड १९ प्रकरणांमध्ये नवीन, अधिक संसर्गजन्य प्रकार वाढीस लागले आहेत. जपानने टोकियो आणि इतर अनेक प्रांतांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहिर केली आहे. वैद्यकीय कर्मचा-यांनी चेतावणी दिली की काही भागात आरोग्य सेवा चालू आहेत त्या कोसळू शकतात.
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने रक्तदानाचे आवाहन केलं आहे .विविध सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहे .कल्याण मधील कोरोना समुपदेशन समिती तर्फे आज कल्याण स्वामी नारायण मंदिर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केलं होतं .या शिबिरात नागरिकांसह भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी रक्तदान केलं .यावेळी देशात विशेषतः ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव वाढतोय .देश संकटात आहे त्यामुळे शक्य आहे त्यांनी रक्तदान ,प्लाज्मा दान करावं असं आवाहन केलं
पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल मिळाल्यानंतर एन . रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . मात्र , शपथविधीनंतर केवळ 48 तासांत एन . रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे . रंगास्वामी यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून , त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे
दोहा इथून, वैद्यकीय सामग्री घेऊन भारतीय नौदलाचं जहाज मुंबईत दाखल, नौदल देशाच्या मदतीसाठी पुढं
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पेट्रोल व डिझेल दरात सतत वाढ होत असलयामुळे सामान्यांचे लॉक डाऊन मधील बजेट मात्र कोलमडलेय. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल चे दर 100 रुपये 4 पैसे तर डिझेल दर 89 रुपये 92 पैसे झाले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसलीय.काल पेट्रोल चे दर पेट्रोल 99 रुपये 79 पैसे होते, तर डिझेल 89 रुपये 58 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 25 पैशाने तर डिझेल मध्ये 24 पैशाने वाढ झालीय.
परभणी- जिल्हावासीयांना प्रशासनाकडून दिलासा. बंद असलेले सर्व शासकीय कार्यालय सुरू होणार. उद्यापासून 15% कर्मचारी संख्येवर कार्यालय चालु करण्याचे आदेश. काही बाजारपेठ ही 10 ते 12 मे दरम्यान उघडण्याचे आदेश. सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत किराणा,भाजी,फळे विक्रीस मुभा. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश
काँग्रेसचे नेते तसंच खासदार राजीव सातव कोरोनामुक्त झाले आहेत. कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 19 दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वार्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.
देशात वाढत चाललेल्या कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला आहे. ते म्हणाले की, "देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही केंद्र सरकार पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूच्या निवडणुकीत व्यस्त होते. निवडणुकीदरम्यान केंद्रातील नेत्यांनी मोठमोठ्या रॅली काढल्या, सभा घेतल्या, नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात देखील मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले होते यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. देशात आरोग्य व्यवस्था तुटपुंजी असल्याची कल्पना देखील केंद्र सरकारला होती. परिस्थिती त्यांनी उपाययोजना करणे गरजेचे होते, लॉकडाऊन करणे गरजेचे होते. परंतु यातील कुठल्याच उपाययोजना न केल्यामुळे देशात मोठ्या संख्येने कोरोना पसरला. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. लॉकडाऊन करण्याची योग्य वेळ हीच आहे. तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. योग्य वेळी खबरदारी नाही घेतली तर आगामी काळात यापेक्षा वाईट परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने यावर गांभीर्याने विचार करुन कडक लॉकडाऊन करण्याची गरज आहे."
बीडच्या केज तालुक्यातील उमरी इथे शेतातील नाली खोदण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यानंतर एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन्ही गटात पुन्हा फ्री स्टाईल हाणामारी झाली. दगड, विटा आणि लाठ्या काठ्यानी त्यांच्यात हाणामारी झाली. यात एकाच्या उजव्या हाताची करंगळी तुटली तर एकाचे दात पडले आहेत. अन्य एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप करुन भांडण सोडवलं. दोन्ही गटातील स्त्री आणि पुरुष मिळून सुमारे 12 ते 13 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
भारतात जाणावणारा ऑक्सिजनचा तुटवडा पाहता मित्र राष्ट्रांनी मदतीचा ओघ सुरु केला आहे. सध्याच्या घडीला भारतीय वायुदलानं इंडोनेशियाहून पुरवण्यात आलेला ऑक्सिजन यशस्वीरित्या भारतात आणला आहे.
पार्श्वभूमी
राज्यात अनेक ठिकाणी 'अवकाळी'चा तडाखा, कुठं शेतीचं मोठं नुकसान तर कुठं जीवितहानी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानं खूप मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी देखील झाली आहे.
बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात आसोला येथील शेतीचे खचून प्रचंड नुकसान झाले. तर जाहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला टेलर व जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेले फळबागांचेही नुकसान झाले.
रविवारी राज्यात 60,226 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यभरात आज 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.4 % एवढे झाले आहे. काल कारण आज 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान
कोरोनावरून सुरु असलेल्या राजकारणावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करु नका, अशा शब्दात गडकरींनी कान टोचले आहेत. नागपूरमध्ये भाजपच्या झालेल्या बैठकीत त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -