Breaking News LIVE : सांगलीत मुलगा आणि वडिलांच्या भांडणात एका म्हशीचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 13 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Mar 2021 07:04 AM
अंबाजोगाई लातूर बसचा भीषण अपघात, सहाजण गंभीर जखमी तर दोघे अत्यवस्थ

अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेल्या बसला पिंपळफाटा जवळ अपघात झाला आहे. विटाची वाहतूक करणाऱ्या उभ्या ट्रॅक्टरला बसने जोरदार धडक दिल्यामुळे बसचे खूप नुकसान झाले आहे. अर्धी बस चिरून बाजूला झाल्याने आतील प्रवाशांना जबर मार लागला आहे. लातूर डेपोच्या बस क्रमांक एमएच 20 बीएल 1053 या बसच्या चालकाने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. आजूबाजूच्या लोकांनी अपघात झाल्याचे कळताच आता अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. रेणापूर पोलिसांना या घटनेची माहिती कळताच रुग्णवाहिका पाठविण्यात आले आहे. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीत 6 जण गंभीर जखमी झाले आहेत तर दोघे अत्यवस्थ आहेत.

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता, अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास याआधीच एनआयए करत आहे

कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे.

लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय पण मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला  कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज त्यांनी हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आवाहन केले

कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून मालेगावात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा

मालेगावात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात कोरोनावर मात करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मालेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून पुढील पंधरा दिवस महत्वाचे असल्याने साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीला महापौर ताहेरा शेख, आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल, अप्पर जिलाधिकारी धनंजय निकम, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पैनगंगा अभयारण्यात दोन पट्टेदार वाघाचे दर्शन

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील घनदाट तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यात वनविभागाच्या पथकाला गस्त घालत असताना दोन पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. माहितीनुसार त्यामधील एक नर तर दुसरी मादी आहे. येथील खरबी रेंजमध्ये या दोन वाघाचे दर्शन झाले आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

बारामतीत एका 18 वर्षीय तरुणाला किडनॅप केल्याचा धक्कादायक प्रकार

बारामतीत एका 18 वर्षीय तरुणाला किडनॅप केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कृष्णराज धनाजी जाचक असं अपहरण केलेल्या मुलाचे नाव आहे. बारामतीतील जळोची भागातून कृष्णराजचे अपहरण झाले. काल संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान पांढऱ्या रंगाच्या एटीयॉस गाडीतून 4 अपहरणकर्ते आले आणि कृष्णराजला पायावर बांबूने मारहाण केली. कृष्णराजला जबरदस्तीने एटीयॉस गाडीत टाकले. जाताना त्याच्या गाडीची चावी आणि मोबाईल हिसकावून घेऊन अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी कृष्णराजच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची मागणी केली. यावरून बारामती पोलीस ठाण्यात 4 अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

वापी औद्योगिक कार्यक्षेत्रातील ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग

वापी औद्योगिक कार्यक्षेत्रातील ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. केमिकल सॉलवंट ड्रमला मोठ्या प्रमाणात आग लागली असूनआजू बाजूला असलेल्या कंपनी मधील कामगारांना बाहेर काढलं आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. 

अहमदनगर : शनी मंदिरात आज शुकशुकाट, भक्तांविना साजरी होतेय शनी अमावस्या

अहमदनगर : शनी मंदिरात आज शुकशुकाट, भक्तांविना साजरी होतेय शनी अमावस्या, शनी अमावस्येला भाविकांना देवाचे दर्शन नाही, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मंदिर आज बंद, कालपासूनच शनी देवाचे मंदिर बंद, दर्शनाला आलेल्या भाविकांचा हिरमोड, रस्त्यावरूनच घ्यावे लागतेय शनीदेवाचे दर्शन, आज शनी अमावस्येवर कोरोनाचे सावट

शिवरायांची इंग्लडमधली जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी कोल्हापूर येथे शिवभक्तांचे रस्ता रोको आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्लडमध्ये असलेली जगदंबा तलवार महाराष्ट्रात यावी यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं झालीत...आता पुन्हा एकदा कोल्हापुरातून मोठं आंदोलन उभा राहत आहे... तावडे हॉटेल चौक कोल्हापूर येथे शिवभक्तांचे रस्ता रोको आंदोलन सुरू

नाशिक : कोरोनाबाबत आज महापालिका आयुक्तांनी बोलावली बैठक

नाशिक : कोरोनाबाबत आज महापालिका आयुक्तांनी बोलावली बैठक, आरोग्य आणि पोलिस अधिकारी राहणार उपस्थित, राज्याच्या मुख्य सचिवांनी कालच नाशिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याच्या दिल्या होत्या सूचना, नाशिक शहर बनले आहे कोरोनाचा हॉटस्पॉट, गेल्या 7 दिवसात शहरात तब्बल 3 हजार 966 नवे रुग्ण

अमरावती-नागपूर माहामार्गावर झालेल्या अपघातात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

अमरावती-नागपूर माहामार्गावर झालेल्या अपघातात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. आज पहाटे जनावरांसाठी शेतातून चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरने तिवसा तालुक्यातील दिवानखेड येथून निघाले असता पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने कैलास हुंडीवले आणि हुंडाआप्पा बहिहट या दोघांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला

महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद,अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बस वर दगडफेक,कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना,दरम्यान, खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक केली बंद,शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात शिवसेनेच्या वाहनांवर केला होता हल्ला,त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात  शिवसेनेने कर्नाटक बस रोखली होती

नीट परीक्षेची तारीख जाहीर

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021' (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख  जाहीर झाली आहे.  परीक्षा यंदा 1ऑगस्टला  होणार आहे. 

पार्श्वभूमी

Breaking News LIVE Updates, 13 March  2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील.
देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढताना पहायला मिळाली,. शुक्रवारी राज्यात 15,817 रुग्णा वाढलेत.. तर 56 जणांचा मृत्यू झालाय. तर मुंबईत शुक्रवारी गेल्या 6 महिन्यातली मोठी रुग्णवाढ झाली, शुक्रवारी मुंबईत शहरात 1646 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या ही पंधराशेच्यावर आहे.तर नागपुरातही रुग्णांची संख्या तब्बल 2000 हजारांच्या पार गेली आहे.. पुणे शहर आणि ग्रामीण मिळून 2423 कोरोना रुग्णा वाढलेत. नाशिक जिल्ह्यात आज 1135 नवे रुग्ण तर 8 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागपुर, नाशिकसह राज्यातली काही शहरांमध्ये विकेंड लॉकडाऊन करण्यात आलाय.


व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना सशर्त जामीन मंजूर 
मुंबई : आयसीआयसीआय बँकनं केलेल्या बेहिशेबी कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयतील विशेष पीएमएलए कोर्टानं व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना 5 लाखांच्या वैयक्तिक जातमुचालक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.याप्रकरणी वेणुगोपाल धूत यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी न्यायाधीश ए.ए. नांदगावकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या अर्जाची दखल घेत त्यांना पाच लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यांनी ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करावे, चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर ते बोलावतील तेव्हा हजर राहावे, देश सोडून जाऊ नये आणि पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे अशा अटीशर्तीवर हा जामीन मंजूर केला आहे. 


एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल 
मुंबई : मनसुख हिरण  मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे  यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल वाझे यांनी ठाण्यातील सेशन कोर्टात  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.