= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 3184 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद.. तर 16 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू... पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसला आग, परिसरातील नागरिकांनी, अग्निशमन दलाने आग विझवल्याने अनर्थ टळला मुंबईतील भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या 605 क्रमांकाच्या बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने हालचाली करत ही आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भांडुप स्टेशनवरुन वैभव चौकच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. भांडुपच्या अशोक केदारे चौक परिसरात ही बस आली असता बसच्या दर्शनी भागातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच या बसने पेट घेतला. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेत प्रवाशांना मागच्या दरवाजातून बाहेर काढले. तोपर्यंत बेस्ट बसच्या पुढील भागात आग पसरली होती. स्थानिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचले आणि ही आग विझवण्यात आली. पीक अवर असल्यामुळे घटना घडली त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. परंतु वेळीच बसला आग लागल्याचं चालकाच्या निदर्शनास येताच प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात आज 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद राज्यात आज 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मुंबईतही रुग्णांचा आकडा वाढताच, आज 1 हजार 646 रुग्ण आढळले, मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूर जिल्ह्यात 128 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद लातूर जिल्ह्यात 1065 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 90 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 419 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 62 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26378 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 932 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 715 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24731 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 49 आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोळसा वाहतूक करणाऱ्या महाकाय डंपरला खदानीतच लागली आग चंद्रपूर : कोळसा वाहतूक करणाऱ्या महाकाय डंपरला खदानीतच लागली आग, शहरालगत असलेली पद्मापुर खुल्या कोळसा खाणीतील घटना, 60 टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता असलेला हा महाकाय डंपर किमान 1.5 कोटी रुपये किंमतीचा आहे, डंपरला आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखून घेतली उडी, याच खाणीत काही दिवसांपूर्वी कोळशाचा भला मोठा थर कोसळून अवजड महागडी यंत्रसामुग्री अजूनही दबली आहे. सरकारी कोळसा कंपनीच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर कामगार नाराज.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 448 कोरोना रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 448 कोरोना रुग्णांची नोंद. आज 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 41 हजार 731 वर.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाणा जिल्ह्यातील वीकएण्ड लॉकडाऊन रद्द, तीन तासातच जिल्हा प्रशासनाने निर्णय बदलला बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आणि दर शनिवार, रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाऊन होता.
आजही जिल्ह्याधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची घोषणा करत परिपत्रक काढलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी आज दुपारी 12 वाजता वीकएण्ड लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र आता वीकएण्ड लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शनिवार आणि रविवारचा लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली. तसा आदेशही काढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी जिल्ह्यातील निर्बंधाना मुदतवाढ, जिल्ह्यात आंदोलन, धार्मिक स्थळ, आठवडी बाजार, विदर्भातील वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पालकमंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात घालुन दिलेले विविध निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत. ज्यामध्ये जिल्हाभरातील सर्व धार्मिक स्थळे 31 मार्चपर्यंत बंद असणार आहेत. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून होणारी वाहतूक ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आठवडी बाजारही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनाच्या धर्तीवर परभणी जिल्ह्यातील निर्बंधाना मुदतवाढ जिल्ह्यातील कोरोना चा संसर्ग वाढत असल्याने पालकमंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात घालुन दिलेले विविध निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत ज्यामध्ये जिल्हाभरातील सर्व धार्मिक स्थळ 31 मार्च पर्यंत बंद असणार आहेत विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून होणारी वाहतूक ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आठवडी बाजार ही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अनुकंपातील नोकरी देण्यासाठी समाज कल्याण अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल, लातूर येथील धक्कादायक प्रकार. घटना आहे लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील. येथील समाज कल्याण अधिकारी आहेत नागेश खमितकर. यांनी एका संस्थेतील अनुकंपातत्वावर नोकरीसाठीचे नियुक्तीपत्र देण्यासाठी एका तरुणीस चक्क शरीरसुखाची मागणी केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पीडित तरुणीचे वडील लातूर येथील एका संस्थेत नोकरी करत होते. त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सदरील तरुणी ही वडिलांच्या जागेवर अनुकंपातत्वावर या ठिकाणी नोकरी मागत होती. तशी कागदपत्रेही तिने दाखल केली आहेत. याबाबत लवकरच तुझे नियुक्तीपत्र काढतो. मात्र, त्याबदल्यात शरीर सुखाची मागणी पूर्ण करावी लागेल असा प्रस्ताव नागेश खमितकर यांनी तरुणी समोर ठेवला. यामुळे त्या तरुणीने तात्काळ याची तक्रार लातूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री यांच्याकडे केली. पोलिसांनी तपास केल्यावर याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्य सरकारचा अर्थसंकल्प बोगस : नारायण राणे राज्य सरकारचा अर्थसंकल्प बोगस, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून अर्थसंकल्पातील आकडेवारी बोगस : भाजप नेते नारायण राणे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्याच्या अर्थसंकल्पावर नारायण राणेंची नाराजी ठाकरे सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प जनतेची फसवणूक करणारा. जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा अर्थसंकल्प. भाजप नेते नारायण राणे यांची टीका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बेळगावमध्ये शिवसेना कार्यालयावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा हल्ला बेळगावमध्ये शिवसेना कार्यालयावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. शिवाय शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची गाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी फोडली. दरम्यान शिवसेना कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांची मोठी गर्दी झाली आहे. इथे निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. शिवाय पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी जिल्ह्यात दोन दिवस लॉकडाऊन; शनिवार, रविवार सर्व राहणार बंद परभणी जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता पालक मंत्री नवाब मलिक यांनी जिल्ह्यात आज रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी म्हणजेच 15 मार्चपर्यंत दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठा लग्नकार्य या ठिकाणी कोरोनाचे नियम न पाळता लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे आज रात्री बारापासून शनिवार, रविवार दोन दिवस आणि सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परभणीकरांना कोरोनावर मात करण्यासाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर नाईलाजाने कडक लॉकडाऊन करण्याची वेळ येणार येईल, असेही नमूद केले आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाण्यातील वीकएण्ड लॉकडाऊन अधिक कडक बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता वीकएण्ड लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल. जिल्ह्यात 567 नवीन रुग्ण असून तर सध्या 3469 अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या चोवीस तासात 07 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे हे आदेश जारी केले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाण्यातील कोविड सेंटरबाहेर येऊन रुग्णांची घोषणाबाजी, दोन वाजेपर्यंत जेवण न मिळाल्याने संताप बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विसावा कोविड सेंटरमधील 160 कोविड रुग्णांनी सेंटरच्या बाहेर येऊन घोषणाबाजी केली. दुपारी 2 वाजेपर्यंत जेवण न मिळाल्याने संतप्त कोविड रुग्ण सेंटरच्या बाहेर आले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे शेतकऱ्यांचा 1 तास रास्ता रोको मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे शेतकऱ्यांनी जवळपास 1 तास रास्ता रोको करत निदर्शने केली. सोलापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग कामासाठी कुरुल येथील पाझर तलावातून मुरूम उचलण्यासाठी दिलीप बिल्डकॉन या कंपनीला परवानगी मिळाली होती. मात्र नियमापेक्षा जास्त मुरूम कंपनी उपसा करीत असल्याचा या शेतकऱ्यांचा आहे. बेकायदेशीररित्या सुरू असलेला हा मुरूम उपसा थांबविण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी अनेक दिवसांपासून निवेदन देत आहेत, मात्र त्याची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. कुरुल पाझर तलाव क्र.१ मधून मुरुम उपशासाठी शासनाकडुन दिलीप बिल्डकॉन कंपनीला ६२ हजार ब्रासची आणि जमिनीपासून ३ मिटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र गेली ४ महिने या तलावातुन मुरुमाचा बेसुमार उपसा सुरु असुन सुमारे दिड लाख ब्रास व १५ ते २० मिटर खोदाई झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांचा आहे. यामुळे तलावाला धोका निर्माण झाला असून अतिवृष्टी झाली तर तलावात पाणी राहणारच नाही, परिणामी तलावाखाली असणाऱ्या सुमारे ५०० एकर शेतीत दलदल सदृश परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुरूम उपशाचे काम बंद करून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास एक तास महामार्ग बंद केल्याने 3 ते 4 किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप गटाला दिलासा नाही बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत लेखा परीक्षण नियमांचा फटका बसलेल्या भाजप गटाला औरंगाबाद खंडपीठातही दिलासा मिळाला नाही. सहकारमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या धनराज मुंडे यांच्या याचिकेत अंतरिम दिलासा द्यायला उच्च न्यायालयाने नकार दिला, त्यामुळे आता केवळ 8 जागांसाठीच जिल्हा बँकेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
एमपीएससीची परीक्षा आता 21 मार्चला होणार एमपीएससीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता 21 मार्चला होणार असून त्या संदर्भातील निवेदन एमपीएससीने जाहीर केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लॉकडाऊन लावण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारला सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पुण्यातील नेत्यांसह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नाल्यांना पुर येऊन मोठं नुकसान होतय. त्यामुळे नाल्यांच्या दुरुस्तीची कामे करणं गरजेचं आहे. परंतु भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेकडे त्यासाठीचा आवश्यक निधी नसल्यानं राज्य सरकारने नाले दुरुस्तीसाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लॉकडाऊन लावण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारला सूचना कोरोना लसीकरण अजून काही महिने चालणार असल्याने काही बंद करा, किंवा लॉकडाऊन करा या पेक्षा गर्दीवर मर्यादा आणणे आणि लोकांना काळजी घेण्यासाठी सांगणे आणि खबरदारी बाळगणे हा पर्याय आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. मतदारसंघातील आणि राज्यातील अनेक गोष्टींवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची घेतली भेट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पुण्यातील नेत्यांसह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नाल्यांना पुर येऊन मोठं नुकसान होतय. त्यामुळे नाल्यांच्या दुरुस्तीची कामे करणं गरजेचं आहे. परंतु भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेकडे त्यासाठीचा आवश्यक निधी नसल्यानं राज्य सरकारने नाले दुरुस्तीसाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अंबानीच्या घरासमोर सापडलेल्या कारचं तिहार जेल कनेक्शन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर टेलिग्रामवरून धमकीचा संदेश पोस्ट करण्यात आला होता. हा संदेश पोस्ट करणारा इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तर याच्याकडून दिल्लीच्या तिहार जेलमधून फोन जप्त करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून प्रेमीयुगुलाची आत्महत्या विधवा प्रेयसी आणि तिला असलेल्या दोन अपत्यांमुळे कुटुंबीय विवाहाला मान्यता देणार नाही. या निष्कर्षाप्रती पोहोचल्यानंतर तरुण प्रियकराने विधवा प्रेयसीसोबत नैराश्यातून वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली .
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
येत्या रविवारपासून तुळजाभवानी मंदिर बंद राहणार येत्या रविवारपासून तुळजाभवानी मंदिर बंद राहणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरू रात्री ढोरखेडा येथे दोन गटात तुफान हाणामारी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरू रात्री ढोरखेडा येथे एका समाजातील दोन गटात तुफान हाणामारी ची घटना घडली. या घटनेत 18 जण जखमी झाले. ग्रामपंचायत सदस्य राजू दौलत सावळे सह दोन्ही गटातील जवळपास 18 जण जखमी झाले.यापैकी आठ जण गंभीर आहेत.एकूण 12 जणांना उपचारासाठी वाशिम येथे पाठविण्यात आले. यासंदर्भात वाशिम च्या शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा : पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्ह्यामध्ये काही निर्बंध लागू होत असून, पुढील काळात लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियम पाळण्याची आवश्यकता आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.