Breaking News LIVE | राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Feb 2021 11:14 PM
परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. परभणी, पोखर्णी, दैठणा इत्यादी भागांत मुसळधार पाऊस. अवकाळी पावसाने ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
पुणे : थकित कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्यामुळे एका कर्जदाराने बजाज फायनान्सच्या मॅनेजरचा खून केला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल (16 फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय 28 वर्षे) असे खून झालेल्या फायनान्स मॅनेजरचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राहुल लक्ष्मण गाढवेला पोलिसांनी अटत केली आहे. याप्रकरणी अमोल भीमराव जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे. उरळीकांचन परिसरातील एका इमारतीत बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी राहुल गाढवे याने बजाज फायनान्समधून पर्सनल लोन घेतले होते. या खर्चाचे हफ्ते त्वरित भरावेत यासाठी मयत रवींद्र वळकुंडे यांनी आरोपीकडे तगादा लावला होता. याच कारणावरुन आरोपीने काल सायंकाळी पाचच्या सुमारास कार्यालयात येऊन रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने रवींद्र वळकुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींचं बंधन असेल. औषधांची दुकानं आणि रुग्णालयं सोडून इतर दुकानं आणि बाजारपेठा संध्याकाळी सातपर्यंत सुरु राहतील. धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्नसमारंभ इत्यादी करीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थितीचे बंधन असेल. अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक असेल. मिरवणूक आणि रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध असेल. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही याबाबत उ.वि.अ. तथा इन्सिडंट कमांडंट यांनी दक्षता घेऊन आणि आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही- राजेश टोपे
तेलगावच्या शिवाजी चौकामध्ये वीज पडून नारळाच्या झाडाला आग. धारुर तालुक्यातील तेलगाव येथील शिवाजी चौकामध्ये परळी रोड वरील माऊली हॉटेल च्या जवळील एका नारळाच्या झाडावर वीज पडून त्या नारळाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे ही घटना आता दहा वाजता घडलेली असून सध्या वातावरण ढगाळ असून विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात येत आहे व मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
अंबरनाथ तहसील कार्यलयाअंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचं काम सुरु आहे. मात्र या मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून केला जात आहे. मात्र या वादातून तहसीलदारांना थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील मतदारयाद्यांमध्ये बोगस नाव टाकून घोळ केल्याचा आरोप करत आरपीआय आठवले गटाचे माजी शहर अध्यक्ष अजय जाधव यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या विरोधात गुन्हा दखल करा त्यांची चौकशी करा अन्यथा मी त्यांना गोळ्या घालून ठार मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी तहसीलदार जयराज देशमुख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं अंबरनाथ पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गोपीचंद पडळकरावर नाव न घेता टीका. सांगलीतील म्हैसाळ मध्ये मिटकरी याचे शिवचरित्र व्याख्यान केले होते आयोजित , व्याख्यानामध्ये बोलताना मिटकरी यानी पडळकर यांना दिला अप्रत्यक्ष टोला.यावेळी अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्या आवाजाची नक्कल करत 'विरोधासाठी विरोध नाही करायचा, शांत बसायचे पण टप्यात आला की करेक्ट कार्यक्रम करायचा'हा डायलॉग म्हणून दाखवला.
कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या आठ साथीदारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी नोटीस धाडली आहे. चोवीस तासाच्या आत या सर्वांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. सोमवारी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे वर फटाके फोडत केलेला आरडाओरडा आणि या धिंगाण्याचं ड्रोन द्वारे शूटिंग करत असल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याचीच चौकशी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नोटीस धाडली आहे. पुणे न्यायालयाने आज गजा मारणे सह आठ साथीदारांना जामीन दिला, त्याचवेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटकेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो नामंजूर करत आधी नोटीस धाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चोवीस तासाच्या आत हजर राहण्याचे पोलिसांनी नोटीसीद्वारे कळवले आहे.
मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद आता पुनहा चव्हाट्यावर आला आहे. विधान सभा अध्यक्ष पदी नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर थेट राज्यपालांनी सरकारला लिहिले पत्र लिहलं आहे. नवीन अध्यक्ष पदाची निवडणूक कधी घेणार? अशी विचारणा राज्यपालांकडून सरकारला करण्यात आली आहे. आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असून यासंदर्भात सरकार राज्यपालांना उत्तर देणार आहे.
नाशिकमध्ये वृद्धाची गळा चिरून हत्या, आंनदवल्ली परिसरात घटना घडली. अज्ञाताच्या हल्ल्यात रमेश मंडलिक यांचा खून. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय. आठ दिवसात चौथा तर दीड महिन्यात शहरात आठवा खून.
थकित कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्यामुळे एका कर्जदाराने बजाज फायनान्सच्या मॅनेजरचा खून केलाय. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सायंकाळीच्या सुमारास हा प्रकार घडला. रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय 28) असे खून झालेल्या फायनान्स मॅनेजरचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राहुल लक्ष्मण गाढवे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमोल भीमराव जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उरळीकांचन परिसरातील एका इमारतीत बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी राहुल गाढवे याने बजाज फायनान्स मधून पर्सनल लोन घेतले होते. या खर्चाचे हप्ते त्वरित भरावेत यासाठी मयत रवींद्र वळकुंडे यांनी आरोपीकडे पाठपुरावा केला होता. याच कारणावरून आरोपीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यालयात येऊन रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने रवींद्र वळकुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नाशिकमध्ये वृद्धाची गळा चिरून हत्या. आंनदवल्ली परिसरात घडली घटना. अज्ञाताने केला हल्ल्यात रमेश मंडलिक यांचा खून. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय. पुढील तपास सुरू. आठ दिवसात चौथा तर दीड महिन्यात शहरात 8वा खून
कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या आठ साथीदारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी नोटीस धाडली आहे. चोवीस तासाच्या आत या सर्वांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. सोमवारी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे वर फटाके फोडत केलेला आरडाओरडा आणि या धिंगाण्याचं ड्रोन द्वारे शूटिंग करत असल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याचीच चौकशी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नोटीस धाडली आहे. पुणे न्यायालयाने आज गजा मारणेसह आठ साथीदारांना जामीन दिला, त्याचवेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटकेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो नामंजूर करत आधी नोटीस धाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चोवीस तासाच्या आत हजर राहण्याचे पोलिसांनी नोटीसीद्वारे कळवले आहे.
पिंपरी चिंचवड साठी आनंदाची बातमी. पुणे मेट्रोच्या फेज वन मध्ये पिंपरी ते निगडी या मार्गाला राज्य सरकारने मान्यता दिलीये. पिंपरी ते स्वारगेट अशा या सतरा किलोमीटर मार्गाचे काम आधीच सुरू आहे. पण पिंपरी ते निगडी या 4.41 किमी मार्गाची मागणी होती, त्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असून त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यास या वाढीव कामाला सुरुवात होईल.
खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणेसह त्याच्या 9 समर्थकांसह पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता या सर्वांना जामीन देण्यात आला. दरम्यान तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस आले होते. परंतु, न्यायालयाने त्यांना घेऊन जाण्यास नकार दिला. पोलिसांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन गजानन मारणे याने मिरवणूक काढली, यामागे काही वेगळा कट आहे का याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. बचाव पक्षाचे वकीलांनी या मागणीला विरोध करीत पोलिसांनी चुकीचे कलम लावल्याचे सांगितले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मारणे याच्यासह सर्वांना जामीन दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट मधील बावीचे भाटले परिसरात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यात काहींच्या डोक्याला मार लागला आहे. सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फोंडाघाट बावीचे भाटले येथील पारकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीच्या वाद होता आणि याच वादातून दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली. या दोन्ही कुटुंबाकडून लाकडी दांडा व इतर साहित्य जे हाणामारी करण्यासाठी वापरण्यात आले ते जप्त करण्यात आले. असून याप्रकरणी कणकवली पोलिस स्थानकात दोन्ही कुटुंबाने मारहाण केल्यानंतर धाव घेतली, मात्र पोलिसांनी सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. आज राज्यभरात 4 हजार 787 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यानंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 76 हजार 093 झाली आहे.
थकित कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्यामुळे एका कर्जदाराने बजाज फायनान्सच्या मॅनेजरचा खून केलाय. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सायंकाळी च्या सुमारास हा प्रकार घडला. रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय 28) असे खून झालेल्या फायनान्स मॅनेजर चे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राहुल लक्ष्मण गाढवे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमोल भीमराव जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उरळीकांचन परिसरातील एका इमारतीत बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी राहुल गाढवे याने बजाज फायनान्स मधून पर्सनल लोन घेतले होते. या खर्चाचे हप्ते त्वरित भरावेत यासाठी मयत रवींद्र वळकुंडे यांनी आरोपीकडे पाठपुरावा केला होता. याच कारणावरून आरोपीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यालयात येऊन रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने रवींद्र वळकुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्याच्या जुन्नरमध्ये क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय. बाबू नलावडे असं त्या खेळाडूचे नाव होते. नॉन स्ट्राईकला उभा असताना अचानक तो खाली बसला आणि नंतर तो खाली कोसळला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता हृदयविकाराचा धक्का आल्याचं निष्पन्न झालं. जाधववाडी येथे मयूर चषक क्रिकेट स्पर्धे दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला, याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. आज दुपारी ओझर आणि जांबुत संघात सामना सुरू होता. ओझर संघाची फलंदाजी सुरू असताना बाबू सोबत ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे टेनिस क्रिकेट प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जातीये.
संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत; संजय राठोड गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती : अजित पवार
अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आदेश. प्रवाश्यांनी मास्क न वापरल्यास वाहतुकदाराला पाच हजार दंड.
नियम न पाळणाऱ्या दुकानांना १० हजार दंड व फौजदारी. हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ १० पर्यंतच. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळल्यास २५ हजार दंड व १० दिवस हॉटेलला सील
लग्नात अधिक उपस्थिती आढळल्यास हॉलचालकाला ५० हजार दंड, १० दिवस हॉलला सील व वधू- वर पक्षावरही फौजदारी
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. आज राज्यभरात 4 हजार 787 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 76 हजार 093 झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 498 कोरोना रुग्ण आढळले, आज 6 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 26 हजार 726
दरवर्षी दीड लाखांहून अधिक बळी रस्ते अपघातात जातात आणि सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. दर चार मिनिटाला एक बळी जातो, ही चिंतेची बाब असून दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या सर्वंकष विकासाच्या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक पोलिस विभागाने आयोजित केलेल्या रस्ते सुरक्षा अभियान 2021 या महिनाभर सुरु असलेल्या मोहिमेचा समारोप बुधवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. याप्रसंगी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर मंगेश देसाई उपस्थित होते. कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वाहतूक विभागाला विशेष सहकार्य करणाऱ्या नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झालेल्या अधिकाऱ्यांच्या vc नंतर नाशिक मध्येही निर्बंध कठोर करणार. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन पुन्हा सतर्क. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा
भिवंडीतील जिलानी इमारत दूर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यास मान्यता दिलीय. मात्र इमारत दुर्घटना पाहणी दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात तीन लाखांची मदत जाहीर केल्यानं सरकारने पाने पुसली का.? असा सवाल आता विचारण्यात येतोय. नारपोली येथील पटेल कंपाऊंड मधील जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या कायदेशीर वारसांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रुपये तीन लाख देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 1 कोटी 14 चौदा लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबंधित 38 मृतांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून वितरीत होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या थोरल्या मुलीचा साखरपुडा झाला असून राम शिंदे यांना जिल्हाधिकारी जावई मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाइन डे म्हणजे 14 फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडलाय. विशेष म्हणजे जावई जिल्हाधिकारी झाल्यानंतर त्याचा सत्कार करायला गेल्यानंतर ही रेशीमगाठी जुळली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या कर्जत तालुक्यातील चौंडी हे राम शिंदे यांचे गाव. राम शिंदे यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. यापैकी मोठी मुलगी अक्षता हिचा नुकताच साखरपुडा झाला असून राम शिंदे यांना जिल्हाधिकारी जावई मिळाला आहे. श्रीकांत खांडेकर असे जावयाचे नाव असून ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राहिवासी आहेत. श्रीकांत बी.टेक करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आय. ए. एस. झाले. त्यानंतर नागरी सत्कारातच माजी मंत्री राम शिंदे आणि खांडेकर कुटुंबाची ओळख झाली. या कार्यक्रमातूनच सोयरीकी जुळली आणि त्याचं नात्यात रूपांतर झाले. श्रीकांत हे सध्या म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत आहेत. तर मुलगी अक्षता ही सध्या पुणे येथे डॉक्टर आहे. जामखेड तालुक्यातील चौंडीत हा समारंभ पार पडला. माजी मंत्री राम शिंदे यांच्या कुटुंबातील हे पहिलेच कार्य असल्यामुळे या दिमाखदार सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली.
अकोल्यातील चतारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सात लसीच्या सात बॉटल गहाळ झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लस गहाळ झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी. चोरी गेलेल्या लसीच्या बॉटल सिरम कंपनीच्या कोविशिल्डच्या आहेत. एका बॉटलमध्ये 11 मिली लस असते.
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात सोलापुरात युवक काँग्रेसच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. एका कारला दोरखंड बांधून सर्व कार्यकर्ते रस्त्याने ही कार ओढली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत कमी असताना देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. याचाच निषेध म्हणून आंदोलन करण्यात आल्याची माहिती युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
गुंड गजानन मारणे आणि शरद मोहोळ या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. या दोघांनाही आज पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी या दोघांच्याही समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी कोर्ट परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. कोर्टाच्या आत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडले जाते. तुरुंगातून सुटल्यानंतर गजा मारणे याने काढलेली मिरवणूक पाहता असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतलीय.
मुंबईच्या वेशीवर निघणारा पैशांचा धूर होणार बंद. एबीपी माझाच्या स्टोरीची सरकारकडून गंभीर दखल, पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून कारवाईचे आदेश. वसई, विरार हायवेवर सुरु असलेल्या अवैध कारखान्यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार : दादा भुसे
माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाने पत्रकार प्रिया रामानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे रवींद्र दामले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
भाजप खासदार उदयनराजे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांत अर्धा तास चर्चा, उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली होती भेट
पालघर : जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आशेरी गडावर यंदा प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या साठी युवाशक्ती प्रतिष्ठान पालघरच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या मुळे सध्या गडावर सध्या साफसफाई व रंगरांगोटीचे काम जोमात सुरू असून हा उत्सव उद्या 18 तारखेला संध्याकाळ पासून सुरू होणार असून 29 तारखेला संध्याकाळी संपेल या मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन गडावर करण्यात येणार आहे. आशेरी गडावर जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण येथून रस्ता असून हे अंतर पायी कापण्यासाठी साधारण 2 तास लागतात.
अहमदनगर येथे वडगावगुप्ता येथील विद्यार्थी आणि पालकांनी शुल्क वसूल करणाऱ्या शाळांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले आहे. जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत थेट शिक्षण अधिकाऱ्यांनाच घेराव घातला. यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात तब्बल दोन तास विद्यार्थी आणि पालक यांनी ठिय्या आंदोलन केले. अवाजवी शुल्क वसूल करणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून देखील वडगाव गुप्ता येथील एका खासगी शाळेने पालकांकडून अवाजवी शुल्काची मागणी केली. शुल्क न भरल्याने शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण देखील बंद केले. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशी समितीने सहा महिने उलटूनही संबंधित शाळेवर कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ पालक व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
अहमदनगर येथे वडगावगुप्ता येथील विद्यार्थी आणि पालकांनी शुल्क वसूल करणाऱ्या शाळांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले आहे. जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत थेट शिक्षण अधिकाऱ्यांनाच घेराव घातला. यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात तब्बल दोन तास विद्यार्थी आणि पालक यांनी ठिय्या आंदोलन केले. अवाजवी शुल्क वसूल करणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून देखील वडगाव गुप्ता येथील एका खासगी शाळेने पालकांकडून अवाजवी शुल्काची मागणी केली. शुल्क न भरल्याने शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण देखील बंद केले. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशी समितीने सहा महिने उलटूनही संबंधित शाळेवर कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ पालक व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
काल रात्रीपासून गोंदिया -भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळी गोंदिया ,गोरेगाव ,सडक अर्जुनी तर भंडारा जिल्यातील भंडारा ,तुमसर आणि लाखनी ,पवनी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. याचा फटका गहू,चना,वाटाणा,लाखोरी,तूर आणि पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणं शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली उपोषणाला बसणार
,
शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील समरजितसिंह घाटगे यांचा सरकार विरोधात आक्रमक पावित्रा
,
अंबाबाईचे दर्शन घेऊन समरजितसिंह घाटगे सपत्नीक लाक्षणिक उपोषणाला बसणार
,
वीज बिलं, कर्जमाफी मुद्द्यावरून सरकारवर साधला निशाणा
,
24 तारखेला भर उन्हात दिवसभर शाहू पुतळ्यासमोर बसून वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणार
,
याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार- समरजितसिंह घाटगे
पालघर : डहाणू तालुक्यातील बारड येथील जंगलात प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गळफास घेऊन योगेश निमला आणि रंजना आगरी या प्रेमीयुगुलाची आत्महत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका बियर बार मध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या भांडणात बियर मालकावरती रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून फरार झालेल्या पैकी एक आरोपी ग्रामस्थांनी पकडून दिला होता. हा पकडून दिलेला आरोपी पोलिसांच्या कोठडीतून फरार झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भंडारा शिवारात हॉटेल रिलॅक्स येथे तीन फेब्रुवारीला हॉटेल मालकावर गोळीबार झाला या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना मंगळवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील कोठडीतून धूम ठोकली त्याला पकडण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे.
एकीकडे मंत्र्यांच्या रॅली, कार्यक्रमांसाठी कोणतेही निर्बंध नाहीत आणि दुसरीकडे शिवजयंतीवर मात्र जाणीवपूर्वक निर्बंध लादले जातात असं म्हणतं मराठा क्रांती मोर्चाने सेना भवन समोर सरकारच्या निषेधार्थ फलकबाजी केली. तसेच 19 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवसेना भवनासमोर जमा होऊन शिवजयंती साजरा करणार असल्याचा इशारा ही सरकारला मराठा क्रांती मोर्चाने दिला.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना पाहायला मिळते आहे. महिनाभरापूर्वी औरंगाबादेत रोज 30 ते 40 रुग्ण समोर येर मात्र आता पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या तीन अंकावर जाऊन पोचली आहे . काल दिवसभरात 120 रूग्ण आढळून आलेले आहेत. सोमवारी हा आकडा 77 इतका होता. औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाची रुग्णसंख्या तीन आकडी गेल्यानंतर कोरोना पुन्हा वाढणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे : भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून दोन आरोपींनी फिल्मी स्टाईलने पलायन केले आहे. कोठडीचे लोखंडी गज कापून चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत फरार झाले. चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दोघाना अटक झाली होती. राजगड पोलीस दोन्ही आरोपींचा पुन्हा शोध घेत आहेत
मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेतही होणार कारवाई...
रेल्वेत मास्क न वापरणाऱ्यांसाठी विशेष मार्शल नेमुन पालिका कारवाई करणार... आतापर्यंत १५ लाख मास्क न वापरणा-या मुंबईकरांकडून ३० कोटींचा दंड वसूल
अकोला जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पावसाला सुरुवात. जिल्ह्यातील अकोट तेल्हारा भागात अवकाळी पावसाच्या सरी.
कोल्हापूर : एकाच गावातील तरुण-तरुणीची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या
,
तरुणाने चुये इथं राहत्या घरी तर तरुणीने पाचगाव येथे नातेवाईकाच्या घरी केले विष प्राशन
,
अनिकेत पाटील असं तरुणाचं नाव तर सानिका व्हनाळकर अस तरुणीच नावं
,
एकाच दिवशी आत्महत्या केल्यानं चुये गावात चर्चेला उधाण
,
प्रेमाला विरोध झाल्यानं टोकाचं पाऊल चालल्याची चर्चा
,
मात्र तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत लग्नासाठी कर्ज व्हायला नको यासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख
गजानन मारणे आणि त्याच्या आठ साथीदारांना कोथरुड पोलिसांकडून अटक.
पार्श्वभूमी
दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचं या संभाव्य वेळापत्रकात बोर्डाने जाहीर केलं आहे. बोर्डाने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिक्षम मंडळाच्या ठरलेल्या कालावधी परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे सरकारच्या परवानगीनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने एप्रिल आणि मे महिन्यात दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा आयोजित केली आहे.
राज्यात लॉकडाऊन नाही, पण नियमांची कडक अंमलबजावणी होणार : आरोग्यमंत्री
काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना बाधितांचा आकडा काहीसा वाढतोय. राज्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच स्थानिक प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले असून त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्या त्यांनी कराव्यात, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, असंही ते म्हणाले.
राठोडांचा राजीनामा घेणार नाहीत कारण..., नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत कारण त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या प्रकरणावर एका मंत्र्याला राजीनामा घ्यावा लागेल अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. त्यावेळी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला.
दक्षिण आफ्रिकेने सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचे 10 लाख डोस परत घेण्यास सांगितलं
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पाठवण्यात आलेल्या कोरोना लसीचे दहा लाख डोस दक्षिण आफ्रिकेला परत करायचे आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. याआधी आम्ही कोरोना लसीकरण अभियानात अॅस्ट्राजेनेकाच्या लसीचा वापर करणार नाही, असं दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलं होतं. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ओळख कोरोना लसीचा पुरवठा करणारी प्रमुख कंपनी म्हणून निर्माण झाली आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाच्या लसीची उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. मागील आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसीचे दहा लाख डोसची पहिली बॅच पोहोचली होती. तर पाच लाख डोसची पुढची बॅच पुढील काही आठवड्यातच तिथे पोहोचणार होती.