Breaking News LIVE : जालना : कोरोना रुग्णाचे दवाखान्यातून पलायन, दुचाकीवरून जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू

Gokul Election Results 2021, Breaking News LIVE Updates, 3 May 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्सचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 May 2021 11:17 PM

पार्श्वभूमी

देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर...अदर पुनावाला पुण्याचे, त्यांनी लसींबाबत महाराष्ट्राला झुकतं माप द्यावं : राजेश टोपेअदर पुनावाला पुण्याचे असल्याने आणि...More

जालना : कोरोना रुग्णाचे दवाखान्यातून पलायन, दुचाकीवरून जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू

जालना जिल्ह्यात कोविड रुग्णालयातुन पळून गेलेल्या कोरोना रुग्णांचा दुचाकी वरून जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. जालना शहरातील भाग्यनगर भागात राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीचा 4 दिवसापूर्वी कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता, त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज दुपारच्या सुमारास या रुग्णाने दवाखान्यातून पळ काढला. दरम्यान औरंगाबाद रोडवर दुचाकीवरून जाताना पाण्याच्या टँकर धडक बसल्याने या रुग्णांचा जागीच मृत्यू झाला, या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी वरून टँकर चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.