Breaking News LIVE : साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन

Breaking News LIVE Updates, 3 May 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्सचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 May 2021 06:56 PM
गांधी विचारक सुमनताई बंग यांचे निधन
ज्येष्ठ गांधीविचारक, चेतना विकासच्या अग्रणी व स्त्रीसक्षमीकरणाच्या कृतीशील मार्गदर्शक श्रीमती सुमनताई बंग आज सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या 96 वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांचे अनुयायी व अर्थतज्ज्ञ दिवंगत ठाकूरदास बंग यांची सहचारिणी आणि समाजसेवी अशोक बंग व डाॅ. अभय बंग यांच्या मातोश्री म्हणून त्या परिचित असल्या तरी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने सुमनताई यांनी समाजमनावर आपला अमिट ठसा उमटवला होता. 
नागपुरात पोलिसांवर अवैध दारू विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांचा हल्ला

नागपूरात पोलिसांवर अवैध दारू विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांचा हल्ला, अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत 'टोली' या वस्तीत अवैध दारु विरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिस पथकावर अवैध दारु विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला, या हल्ल्यात नागपुरातील अजनी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षकाची गाडी फोडण्यात आली आहे. 

राज्यात आज 59,500 रुग्णांना डिस्चार्ज, 48,621 नव्या रुग्णांची नोंद

मोठा दिलासा... राज्यात आज 59,500 रुग्णांना डिस्चार्ज, 48,621 नव्या रुग्णांची नोंद

साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन

साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, 
औषधाची दुकाने वगळता सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ,
शेती अवजारे आणि इतर किराणा घरपोचसाठी परवानगी,
अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई,
सातारा उपजिल्हाधिकारी यांचे आदेश,

डोंबिवलीतील विभा कंपनीच्या जागेत महापालिका उभारणार 580 बेड्सच कोविड रुग्णालय

डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ती दिल्यामुळे रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेत 580 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

सांगली मनपा क्षेत्रात बुधवारपासून सात दिवस जनता कर्फ्यू

सांगली मनपा क्षेत्रात बुधवारपासून जनता कर्फ्यू,  मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या रुग्णाच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने घेतला निर्णय, बुधवार दिनांक 5 मे पासून सात दिवस जनता कर्फ्यू लागणार, 11 वाजेपर्यंत किराणा व भाजी विक्रीसाठीं होम डिलिव्हरीला परवानगी

शेजाऱ्याशी भांडण झालं म्हणून एका महिलेनं आपल्या 14 महिन्याच्या मुलाला खाली फेकलं

औरंगाबाद बजाजनगर भागातील खळबळजनक घटना, बजाजनगर जिजामाता हौसिंग सोसायटीत शेजाऱ्याशी भांडण झालं म्हणून एका महिलेनं आपल्या 14 महिन्याच्या मुलाला खाली फेकलं, 3 वर्षाच्या मुलीलाही दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलंआणि स्वतः ही उडी घेतली. 14 महिन्याच्या मुलाचा जागीच मृत्यू आणि 3 वर्षाच्या मुलीसह आई गंभीर जखमी, घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवलं..

बारामतीत 5 ते 11 मे दरम्यान कडक लॉकडाऊन

बारामतीत परवापासून कडक लॉकडाऊन, वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर 5 ते 11 मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन लावण्याचा प्रशासनाचा निर्णय मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद, दूध विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 पर्यंत मुभा

डोंबिवलीत मनसे तर्फे मोफत पोर्टेबल स्प्रे ऑक्सिजन सिलिंडची सुविधा

कोरोनाचा वाढता धोका आणि ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा लक्षात घेता नागरिकांना ऑक्सिजन सहज उपलब्ध व्हावा यासाठी डोंबिवलीत मनसे तर्फे  गरजूंना मोफत पोर्टेबल स्प्रे ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा देऊ केली आहे. सहज हाताळता येण्यासारखा ऑक्सिजन सिलेंडर फक्त कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 350 स्प्रेचा हा सिलेंडर असून एखाद्या रुग्णाला त्रास जाणवू लागल्यास रुग्णवाहिका तसेच ऑक्सिजन सिलेंडर बेड उपलब्ध होईपर्यंत या सिलिंडर स्प्रेचा गरजूंना उपयोग होणार आहे. एकावेळेस तीन स्प्रे करुन रुग्णांनी ऑक्सिजन घ्यायचा आहे. पुढील तीन मिनटं  त्यांची ऑक्सिजन पातळी योग्य प्रमाणात रहात असल्याचे यावेळी रमेश यादव यांनी सांगितले. 750 रुपये या सिलिंडरची किंमत असून स्वखर्चातून हे गरजू रुग्णांना दिले जात आहे.

आयपीएलमधील कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द

आयपीएलमधील कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द करण्यात आला आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. तर संघातील इतर खेळाडू विलगीकरणात आहेत.

१ मे पासून राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार संपावर. गरीबांचे धान्य मिळविण्यासाठी होणार हाल

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवून देखील शासनाने मागण्या मान्य न केल्याने राज्यातील 55 हजारावर  शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेल्याच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर.व्ही. अम्बुस्कार यांनी सांगितल. राज्यात जवळपास 200 दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून सध्या राज्यात 3 हजार स्वस्त धान्य दुकानदार कोरोनाबाधित आहेत. सरकारने यासर्व बाबीकड़े दुर्लक्ष करत असून सर्व दुकानदारांना विमा कवच द्यावे , ई - पॉज मशीन मुळे कोरोना संसर्ग वाढता असून त्यावर पर्याय शोधावा अशा मागण्या या दुकानदारांच्या आहेत , त्यामुळे कालपासुन स्वस्त धान्य दुकानदारानी संप सुरु केलाय , मात्र लॉकडाउन मुळे मात्र आता सर्वसामान्या गरीबाना धान्य मिळविण्यासाठी त्रास होणार हे नक्की.

वर्ध्यात आई आणि मुलगी घरी मृतावस्थेत आढळल्या

वर्ध्याच्या सावंगी (झाडे) गावात आई आणि मुलगी घरी मृतावस्थेत आढळल्या. सुभद्रा मांडवकर असं आईचं (वय 85 वर्षे) नाव असून सुरेखा पाचखंडे (वय 45 वर्षे) असं मुलीचं नाव आहे. दोघीही कुटुंबापासून वेगळ्या राहत होत्या. मुलगी घरीच आजारी होती. दुर्गंधी आल्यानंतर त्यांच्या दोघींचा मृत्यू झाल्याची बाब उघड झाली. दरम्यान, शवविच्छेदनापूर्वी झालेल्या अँटीजेन चाचणीत दोघींचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं. 

बुलढाणा : कोविड सेंटरच्या परिसरात सर्पमित्रानं सोडले विषारी साप
बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या अजुबाजुच्या परिसरात एका सर्पमित्राने पकडून आणलेले 6 ते 7 विषारी साप सोडल्याने परिसरात आणि कोविड रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरात कुठेही साप निघाला की, सर्प मित्राला बोलावण्यात येतं, सर्प मित्र सापाला पकडून सुरक्षित जंगलात सोडतात, पण मलकापुरातील अकरम नावाच्या सर्पमित्राने पकडलेले हे साप चक्क रुग्णालयात सोडल्याने खळबळ उडाली आहे. काही कर्मचाऱ्यांनी या सर्पमित्राला वेळीच हटकलं म्हणून काही साप त्याने पकडून नेले, पण रुग्णालाय परिसरात साप त्याने का सोडले? याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. मलकापुरातील या कोविड सेंटर परिसरात अत्यंत घाणीचं साम्राज्य असल्याने परिसरात नेहमीच साप निघतात, आता तर सर्पमित्रसुद्धा या रुग्णालय परिसराला जंगल म्हणून सर्पमित्र या परिसरात साप सोडतात.

 

पार्श्वभूमी

विरोधी पक्षांचं केंद्राला पत्र, मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह


देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता विरोधी पक्षांनी रविवार (2 मे) केंद्र सरकारला मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह केला. याबाबत काँग्रेस,  राष्ट्रवादी, शिवसेनेसह इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्रित पत्रक काढलं आहे. यामध्ये केंद्राने देशातील सगळ्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.


या पत्रकात म्हटलं आहे की, "देशात कोरोनाची महामारा ज्यावेगाने पसरत आहे, ती पाहता आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतो की देशातील सर्व रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा. सोबतच सरकारने तातडीने देशातील लोकांचे मोफत लसीकरण करावे. याशिवाय अर्थसंकल्पात लसीकरणासाठी तरतूद केलेल्या 35 हजार कोटींचा वापर मोहिमेसाठी करावा."


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीसंदर्भात नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या; मुख्यमंत्र्यांच्या सूचना


अवघ्या काही दिवसांवरच पावसाळा ऋतू येऊन ठेपला आहे. त्यामुळं येऊ घातलेल्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वय राखत अतिशय काळजीपूर्वक काम करावे, सोबतच नागरिकांना वेळीच सुचना मिळतील याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. रविवारी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा पावसाळयापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेताना ते बोलत होते. 


सदर आढावा बैठकीला कोकणातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मस्त्यव्यवसाय विकास, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती प्रशासनाला दिली. आपत्ती व्यवस्थापनासोबतच दरम्यानच्या काळात मासेमारी व्यावसायिक बोटींशी संपर्क ठेवत त्यांनाही सूचना पोहोचवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्याचे  नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याबाबतची काळजी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.