वाशिम : लग्नाला नकार दिला म्हणून १८ वर्षीय तरुणीला जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थरकाप उडवणारी ही घटना वाशिम जिल्ह्यातील सावळ गावातील आहे. याप्रकरणी आरोपी रवी भालेरावला पोलिसांनी अटक केली आहे.


रवी भालेराव हा गावात राहणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. १९ जूनला तरुणी घरात एकटी असताना रवीने तिला लग्नासाठी विचारणा केली. मात्र तरुणीने रवीला स्पष्ट शब्दात नकार दिला. तरुणीच्या नकाराने चिडलेल्या रवीने तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं.


यामध्ये तरुणी ८० टक्क्याहून जास्ता भाजली होती. जळालेल्या अवस्थेत तरुणील अकोल्याच्या जिल्हा रुग्णालात दाखल करण्यात आले. चार दिवस तरुणीने दिलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली शनिवारी तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी रवी भालेरावला अटक केली आहे.