सातारा : साताऱ्यातील प्रतापगडावर दुर्देवी घटना घडली असून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाच्या डोक्यात तटबंदीचा दगड पडल्याने लहान मुलाचा मृत्यू झाला. ओम प्रकाश पाटील असे या लहान मुलाचे नाव असून हे संपूर्ण कुटुंब सांगली तासगाव येथून महाबळेश्वर पाचगणी पाहण्यासाठी आले होते.
ओम हा अवघा बारा वर्षाचा असून हे संपूर्ण कुटुंब महाबळेश्वर फिरुन प्रतापगड पाहण्यासाठी आले होते. प्रतापगडाच्या वरती चढताना पायथ्यालाच ओमचा फोटो त्याच्या बहिणी काढत होत्या. त्याच वेळी वरच्या बाजूला असलेल्या तटबंदीचा मोठा दगड ओमच्या डोक्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा सर्व प्रकार या कुटुंबीयांनी पाहिल्यामुळे या कुटुंबाला काय करावे सूचत नव्हते. प्रतापगडावरील तटबंदीचे असे अनेक दगड हे खपारीतून सुटत असल्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी वेळोवेळी संबंधित विभागाकडे केली जाते. मात्र त्याकडे वेळीच लक्ष दिले जात नसल्याने स्थानिकांकडून या नाराजी व्यक्त केली जाते आहे.
प्रतापगडाच्या तटबंदीतील दगड कोसळून चिमुरड्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2018 08:50 PM (IST)
प्रतापगडाच्या वरती चढताना पायथ्यालाच ओमचा फोटो त्याच्या बहिणी काढत होत्या. त्याच वेळी वरच्या बाजूला असलेल्या तटबंदीचा मोठा दगड ओमच्या डोक्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -