बहिरोबावाडीत लष्कर वस्तीवरील शिवाजी लष्करच्या घरासमोर रविवारी साप आढळला. त्यावेळी शिवाजीने काठी हातात घेऊन सापाला हाताने पकडण्याची स्टंटबाजी सुरु केली. मोबाईलमध्ये चित्रीकरणही सुरु झाल्याने त्याची स्टंटबाजी वाढत गेली. त्याच्या सभोवती कुटुंबातील तसेच शेजारील महिला- पुरुषांची गर्दी झाली. तसे सापासोबतचे खेळ वाढत गेले.
सापाच्या तोंडावर काठीने दाबून दुसऱ्या हाताने तोंडालगत पकडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. सापाकडून हाताला वेटोळे घातले जात होते. ते भयानक दृश्य पाहणाऱ्या महिलांच्या काळजाचे ठोके वाढत होते. मात्र स्टंटबाजीने झपाटलेल्या शिवाजीने मनात फक्त सापाला तोंडाजवळ पकडण्याची इर्षा होती. साप विष बाहेर टाकतोय हेही शिवाजी सर्वांना सांगत होता. तेवढ्यात सापाने त्याच्या हाताला चावा घेतला. पुढील तीन तासांच्या आतच शिवाजीची जीवनयात्राही संपून गेली.
पाहा व्हिडीओ :