Booster Dose Live Updates : आजपासून 'बूस्टर', वाचा यासंबंधीचे प्रत्येक अपडेट्स

Booster Dose : देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात झालीय.

abp majha web team Last Updated: 10 Jan 2022 10:30 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात...More

 पुण्यात आजपासून 179 केंद्रांवर बूस्टर रोज द्यायची सुरूवात
 पुण्यात आजपासून 179 केंद्रांवर बूस्टर रोज द्यायची सुरूवात महापालिकेने केली आहे ..आज सकाळपासूनच बूस्टर डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर  गर्दी केलेली पाहायला मिळाली... गेले दोन दिवस कोविन ॲप वरून दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस संदर्भातली  माहिती देणारे मेसेजेस सातत्याने येत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर  गर्दी केली आहे... 25 टक्के ऑनलाईन आणि 25 टक्के ऑफलाइन अशा पद्धतीने बूस्टर डोस देण्यात येणार असून 179 केंद्रांवर कोविशील्ड तर दहा केंद्रांवर covaxin देण्यात येणार आहे