मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपवासी असलेल्या खासदार नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' या आत्मचरित्राने सध्या राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या 192 पानांच्या पुस्तकात नारायण राणे यांनी त्यांचा एक सामान्य शिवसैनिक ते भाजप खासदार इथपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.


'नो होल्ड्स बार्ड'मध्ये राणे यांच्या शिवसैनिक ते भाजप खासदार या प्रवासाचे 12 टप्पे आपल्याला वाचायला मिळणार आहेत. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच त्यापैकी काही टप्प्यांची माहिती मिळाली आहे.


या पुस्तकात राणे यांचा सुरुवातीचा प्रवास हा पहिला टप्पा, शिवसैनिक हा दुसरा टप्पा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतानाच्या आठवणी, तेव्हाचे राजकारण, किस्सा कुर्सीका (खुर्चीचा किस्सा - या टप्प्यामध्ये खुर्चीसाठी महाराष्ट्रात त्या काळात झालेलं राजकारण, कटकारस्थानं वाचायला मिळणार आहेत) , या टप्प्यांमध्ये नारायण राणे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भरभरुन लिहिलं आहे.

त्यानंतर काँग्रेसच्या वाटेवर हा एक महत्त्वाचा टप्पा पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहे. मुख्यमंत्री पदाचं राजकारण करुन झालेली फसवणूक हा त्याच्या पुढचा टप्पा, त्यानंतर भाजप प्रवेश (या टप्प्यात राणे यांना भाजपने दिलेली आश्वासनं, शिवसेनेने भाजपला राणे यांच्या पक्षप्रवेशावरुन कसे अडवले याबाबतची माहिती वाचायला मिळेल)

नारायण राणे यांच्या या राजकीय आत्मचरित्रातून अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर येणार आहेत. त्यापैकी दोन महत्त्वाच्या गोष्टी बाहेर पडल्यापासून सर्वत्र वादळ उठले आहे.

VIDEO | नारायण राणेंच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेसंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट | एबीपी माझा



नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर मी घर सोडून जाईन, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचा खळबळजनक दावा खासदार नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे.

VIDEO | नारायण राणे आत्मचरित्रातून उलगडणार अनेक गुपितं? | मुंबई | एबीपी माझा



नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलंत, तर मी घर सोडून जाईन, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचा खळबळजनक दावा खासदार नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी कान भरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राणेंना डावलून सुभाष देसाईंना विरोधी पक्ष नेते पद दिल्याचा खळबळजनक दावा देखील राणेंनी पुस्तकात केला आहे.

Narayan Rane | नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे भाजप प्रवेश रखडला : नारायण राणे | मुंबई | ABP Majha