Bombay High Court: घरात येशू ख्रिस्ताचे फोटो (picture of Jesus Christ) असल्‍याचा अर्थ तो किंवा तिने ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला (converted to Christianity) आहे असा होत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने नुकतेच नोंदवले. जिल्हा जात छाननी समितीच्या (DCSC) निर्णयाविरुद्ध अल्पवयीन मुलीने याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील असल्याचा तिचा दावा समितीने फेटाळून लावण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निरीक्षणे नोंदवली. खंडपीठाने समितीला आदेशाच्या तारखेपासून दोन आठवड्यांच्या आत ती “महार” जातीची असल्याचे प्रमाणपत्र देण्यास सांगितले.


न्यायमूर्ती पृथ्वीराज के. चव्हाण आणि न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठासमोर (Bombay High Court) याचिकाकर्त्या अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेत सांगितले होते की, फोटो कोणीतरी भेट म्हणून दिले होता आणि त्यामुळे तो घरात लावण्यात आला होता.  दक्षता कक्षाला (Vigilance Cell) याचिकाकर्त्याच्या घरी भेटीदरम्यान येशू ख्रिस्ताचा फोटो आढळल्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये समितीने दावा फेटाळून लावला होता. 


खंडपीठ काय म्हणाले? 


केवळ दक्षता कक्षाच्या अधिकाऱ्याला, याचिकाकर्त्याच्या घरी भेटीदरम्यान, प्रभु येशू ख्रिस्ताचा फोटो दिसल्याने, त्याने असे गृहीत धरले की याचिकाकर्त्याचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते. कोणताही विचारी पुरुष/स्त्री हे स्वीकारणार नाही किंवा विश्वास ठेवणार नाही की घरात येशू ख्रिस्ताचा फोटो आहे म्हणून एखाद्या व्यक्तीने स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, असे खंडपीठाने नमूद केले.


“महार” जातीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी


याचिकाकर्त्याने तिची 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि तिने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) उत्तीर्ण केली होती. तिने बौद्ध धर्माचा अभ्यास करणारा असल्याचे सांगत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून मान्यता मिळण्यासाठी “महार” जातीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली होती. 


याचिकाकर्त्याच्या वडिलांनी किंवा आजोबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी बाप्तिस्मा (baptism) घेतला होता हे सिद्ध करण्यासाठी "कोणतेही पुरावे नाहीत" असेही हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले.  याचिकाकर्त्याच्या कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय हा श्रमिक होता आणि कुटुंबातील विवाह बौद्ध विधींनुसार पार पाडले जात असल्याचे नमूद केले.


इतर महत्वाच्या बातम्या