जळगाव : वाढलेल्या तापमानामुळे शिरसोलीच्या फटाक्याच्या कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिरसोली-जळगाव दरम्यान प्रकाश शामलाल मिलवाणी यांच्या मालकीच्या शामाफायर या फटाक्यांच्या कंपनीत आज दुपारी हा स्फोट झाला.
वाढलेल्या तापमानामुळे फटाक्याच्या दारुच्या रुममध्ये स्फोट झाला. जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोलीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शामाफायर कंनीत फटाक्याच्या दारुच्या स्फोटक रुममध्ये दोन मजुर काम करीत असतांना हा स्फोट झाला. यात दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
आज दुपारी 3:45 वाजता झालेल्या स्फोटात मद्रास येथील हेंमंत जयस्वाल (वय 45) आणि शिरसोली येथील राजेंद्र बाबुराव तायडे (वय 36) यांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.