चंद्रपूर : व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यात काळ्या रंगाच्या बिबट्याचं दर्शन झालं आहे. रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिनी हा बिबट्या दिसला.

रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अतिशय दुर्मिळ असणारा हा काळा बिबट्या सकाळी पर्यटकांच्या नजरेस पडला. डौलदार चालीच्या या अनोख्या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटक आनंदी झाले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात पहिल्यांदा हा बिबट मागच्या वर्षी नजरेस पडला होता.

व्हिडीओ :