सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपने सुरु केल्या आहेत. भाजपच्या मुलाखती सुरु असताना, सर्वांचीच भंबेरी उडवून देणारा प्रसंग घडला.
भाजपकडून तिकीट मिळावी म्हणून मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवाराने चक्क 30 लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली. यावेळी मुलाखत घेणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
नेमका काय प्रकार घडला?
मिरजेत आज भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखती दरम्यान मिरजेतील सचिन चौगुले या भाजपच्या कार्यकर्त्याने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट 30 लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली. पैसे असणारा उमेदवार हीच विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे 30 लाख रुपये आहेत, असे खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच या कार्यकर्त्याने चेक झळकावला. यामुळे व्यासपीठावर बसलेल्या भाजपा आमदार आणि नेत्यांची भंबेरी उडाली.
चौगुलेच्या उमेदवारीसाठीच्या या विधानामुळे भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सांगली आणि मिरजेत सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनासह सर्वच उमेदवारांकडून उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखतस्थळी नानाविध युक्त्या करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या या इच्छुक उमेदवाराने थेट 30 लाखांचा चेक दाखवल्याने भाजपच्या उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सांगलीत भाजपच्या उमेदवारीसाठी 30 लाखांचा चेक झळकावला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2018 09:39 PM (IST)
भाजपकडून तिकीट मिळावी म्हणून मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवाराने चक्क 30 लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली. यावेळी मुलाखत घेणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -