नागपूर : भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा ट्रेनमध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 53 वर्षीय नवनीत बेहरे यांना नागपूरला जाताना हृदयविकाराचा धक्का आला.

नवनीत बेहरे हे नागपुरातील प्रभाग क्रमांक 9 मधून भाजप अध्यक्ष होते. नागपूरहूनन भाजपच्या स्पेशल ट्रेनने गुरुवारी ते मुंबईला आले होते.

सुमारे 24 तासांच्या प्रवासानंतर सुरत मार्गे ही ट्रेन शुक्रवारी दुपारी मुंबईला पोहचली होती. मध्यरात्री सुमारास मुंबईहून ट्रेन परत नागपूरसाठी निघाली. रात्री अडीच वाजताच्या सुमारास ट्रेन डहाणूजवळ असताना नवनीत बेहरे यांना चालत्या ट्रेनमध्ये हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

नवनीत बेहरे यांचा मृतदेह डहाणूला उतरवून ट्रेन नागपूरला रवाना झाली. उत्तरीय तपासणी आणि इतर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बेहरे यांचा मृतदेह नागपूरला नेला जाईल.

मुंबईतील बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आलेला भाजपच्या महामेळाव्याचा शुक्रवारी दुपारी समारोप झाला. मात्र यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वांद्रे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप झाला.
संबंधित बातम्या :

भाजपच्या महामेळाव्यासाठी 50 कोटींचा खर्च : अशोक चव्हाण

MMRDA ची थकबाकी न भरणाऱ्या ‘सोफिटेल’मध्ये अमित शाहांचं वास्तव्य

सत्तेच्या शिकारीसाठी सर्व लांडगे एकत्र येत आहेत : मुख्यमंत्री

भाजपचा महामेळावा संपला, मुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीची चिन्हं

पवारांच्या इंजेक्शनमुळे राहुल गांधी बोलतात: अमित शाह

भाजपचा महामेळावा, मुंबईकरांना मनस्ताप, भाजपच्या बस रोखल्या

LIVE : मोदी सरकारने केलेल्या कामावर निवडणूक जिंकणार : अमित शाह

या मार्गांवर प्रवास टाळा, भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होणार

अमित शाहांच्या स्वागत रॅलीचा शिवसेना नगरसेविकेसह मुंबईकरांनाही फटका