Sanjay Gaikwad on Election Commission : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे बोगस मतदारांच्या मुद्यावरुन निवडणूक आयोगावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट निवडणूक आयोगाची लाजच काढली. निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे. आमच्याकडे 20 आणि 22 टक्के मतदान होतं, असे म्हणत आमदार संजय गायकवाड हे निवडणूक आयोगावर संतापल्याचं पाहायला मिळालं.
अनेक नगरसेवकही मतदार याद्यात बोगस नावे टाकतायेत
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ आहेत. 20 ते 30 वर्षापासून मृत व्यक्तिंची नावे मतदार यादीत आहेत. अनेक नगरसेवकही बोगस नावे मतदार यादीत टाकत आहेत. आधीच आमच्याकडे वीस ते तीस टक्के मतदान होतं आणि त्यामुळं चांगला व्यक्ती निवडून येत नाही. निवडणूक आयोगाला याची लाज वाटली पाहिजे असं शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला सुनावलं आहे.
मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक
मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात काल (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी देखील मतचोरीच्या विरोधात काल मोर्चा काढला होता. या मोर्चात बोलताना राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मतचोरीच्या मुद्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, या मोर्चानंतर आता सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड हे देखील बोगस मतदार यादीच्या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाची लाजच काढळ्याचं पाहायला मिळालं. अनेक बोगस नावे मतदार यादीत येत असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत. त्यामुळं चांगली लोकं निवडणून येत नसल्याचे गायकवाड म्हणाले.
जोपर्यंत मतदार याद्यातील घोळ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये
गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यातील घोळ आणि मतचोरीच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. जोपर्यंत मतदार याद्यातील घोळ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: