Partition Day 2022 : येत्या 14 ऑगस्टला भाजप देशभरात फाळणी दिवस (Partition Day)पाळणार आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी केली होती. आता दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जाणार आहे. राज्यातही हा दिवस पाळला जाणार आहे. या निमित्तानं भाजपकडून राज्यभरात मूक मोर्चा काढला जाणार आहे.


75 वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. आता दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस पाळला जाणार आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात 14 ऑगस्ट- फाळणी दिन हा "विभाजन विभीषिका स्मृति दिवस" म्हणून पाळला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. 


असा असेल भाजपचा कार्यक्रम 


भारत पाकिस्तानच्या फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या दुःखद घटनेची आठवण म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दोन कार्यक्रम करावेत.


दोन कार्यक्रमांमध्ये एक मूक मिरवणूक, यात्रा तर दुसरा सभागृहात आयोजित करावा.


 मिरवणूक,यात्रेत बॅनर, फाळणीच्यावेळी घडलेल्या घटनांशी संबंधित फलक, राष्ट्रध्वज तिरंगा लावला जाणार आहे.


ज्या लोकांनी फाळणीमध्ये वेदना व दुःख भोगले, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या स्मरणार्थ मूक मिरवणूक, यात्रा निघेल.


सभागृहात फाळणीसंबंधी माहिती व दुःखद घटनेचे स्मरण करुन देणारे चर्चा सत्राचे आयोजन केले जाणार आहे. 


फाळणीमध्ये ज्या कुटूंबिय किंवा व्यक्तींनी दुःख, वेदना सोसल्या त्यांचा सन्मान केला जाणार आहे 


फाळणी दिनासंबंधी प्रदर्शनी लावून त्यामध्ये वृत्तपत्रामधील तसेच अन्य लेख आणि छायाचित्रे लावणे.