LIVE UPDATE | ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचा अहवाल उद्या मुख्यमंत्र्यांना सादर करणार

वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप राज्य सरकारला शॉक देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करत आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी भाजप वीज बिल होळी आंदोलन करणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Nov 2020 09:51 PM
ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचा अहवाल उद्या मुख्यमंत्र्यांना सादर करणार. ओबीसी समाजासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली होती. या मागणीवरून राज्य सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीती गठीत केली होती. या उपसमितीचा अहवाल उद्या मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. उद्या सायंकाळी सात वाजता हा अहवाल वर्षा वर मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे.
आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचे निधन
कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी. जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या मनपा, जिल्हा परिषद आणि तालुका स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना. येत्या दिवसांत मनपा, नगरपालिका क्षेत्रातील दुकानदार, छोटे व्यवसायिक, दुकानदार, दूध विक्रेते, लोकांच्या संपर्कात येणाऱ्यांचं सर्व्हेक्षण होणार. लक्षणे आढळल्यास होणार तपासणी. लक्षणे नसतील तर 15 दिवसांनी पुन्हा सर्व्हेक्षण होणार 
भाजपचं वीज बिल होळी आंदोलन; मुंबईत अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलन; कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, अतुल भातखळकरांसह भाजप आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद पैठण रोडवरील धुपखेडा येथील जुने गावातील साईमंदिरात चोरी. दीड किलो चांदीचे मुकुट आणि 10 ते 12 ग्राम सोन्याचा पट्टा, दान पेटी असा अंदाजे दीड लाखाचा ऐवज लंपास.
मिशन बिगीन अगेनचे नवे निर्देश जाहीर. महाराष्ट्र सरकारचं महत्वाचं पाऊल. कोरोनावर आळा घालण्यासाठी हळूहळू कठोर निर्णय घेणार. दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी.
वाढीव वीज बिलांविरोधात भाजपचं मुंबईत आंदोलन, कांदीवलीत पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट
राज्यभरात 2 हजार ठिकाणी वीज बिलांची होळी; भाजपच आज राज्यव्यापी आंदोलन, नागपुरात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन
पुणे शहर भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलांविरोधात निदर्शनं; राज्य सरकार, मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी
नागपूर :

भाजपचा वीज बिल होळी आंदोलन सुरु झालं असून

कोराडी परिसरात महादूला भागात सिद्धार्थ नगरमध्ये आंदोलन होत आहे. आंदोलनाचं नेतृत्त्व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे करत आहेत. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'लोकांनी वीज बिल भरू नये, आम्ही वीज जोडणी कापू देणार नाही. वीज मंडळाचे कर्मचारी वीज कापायला आल्यास लोकांनी भाजपला कळवावे, आम्ही त्यांच्यासाठी संघर्ष करू,

राज ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचं अभिनंदन करतो, जनतेच्या मुद्द्यांसाठी ते संघर्ष करत आहेत.

सरकारच्या मोगलशाही विरोधात एकत्रित यावेच लागेल,'
आठ महिन्यापासून बंद असणाऱ्या मंदिराना वीजबिल माफ करावं. तसेच मंदिरांवर उपजीविका करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना विजबिलात सवलत द्यावी, अशी मागणी अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार सहभागी होणार आहे. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या राज्यात वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलंचा तापल्याचं दिसत आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अशातच भाजपकडून आज राज्यभरात वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजप वीज बिलांची होळी करणार आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलंचा तापल्याचं दिसत आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अशातच भाजपकडून आज राज्यभरात वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजप वीज बिलांची होळी करणार आहे.


 


वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप राज्य सरकारला शॉक देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी भाजप वीज बिल होळी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.


 


भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, 'कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय.' पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारलं आहे. जनतेने यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो.'


 


भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार सहभागी होणार आहे. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.


 


वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप


 


वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा वाद आता रंगताना दिसत आहे. वीज बिलं कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरलं, हे विश्वासघातकी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केलीय. तर भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा पलटवार ऊर्जा मंत्ती नितीन राऊत यांनी केला आहे. भाजपची सत्ता राज्यात असताना 5 वर्षात महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.