सोलापूर लंडनमधून महाराष्ट्रात 16 नोव्हेंबर रोजी वाघनखं (WaghNakha) मुंबईत आणण्यात येणार आहेत. त्याआधीच या वाघनखांवरुन राजकारण तापलंय. ही वाघनखं शिवरायांची आहेत का? यावरुन वाद सुरु झाले आहे.  ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) काल वाघनखांवरुन सरकारला सवाल केला. या दोन्ही मुद्यांवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी ठाकरे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार खासदार सोडून गेले त्यामुळे ठाकरे पितापुत्र झोपेत बरळतात, उर बडवून घेतात, अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांना भाडेकरू, चिंधीचोर असे म्हणत टीका केली आहे


लक्ष्मण ढोबळे म्हणाले, शिवरायांच्या नावावर मातोश्री एक, मातोश्री दोन उभारणारे आज वाघनख्यांवर संशय घेत आहेत. आमदार खासदार सोडून गेले त्यामुळे ठाकरे पितापुत्र झोपेत बरळतात, उर बडवून घेतात. सरकारला विनाकारण बदनाम करणाऱ्यांवर जरब,दहशत बसावी यासाठी ही वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. शिवसेनेच्या नावावर तुम्ही चोऱ्याच केल्या, आंतरराष्ट्रीय चोर म्हणून तुमचा उल्लेख होतो. या वाघ नखांचा उपयोग होणार नाही पण तुमच्यावर दहशत राहील. 


गेली 50 वर्षे भगव्या झेंड्याखाली ज्यांनी अध्यात्माची लोकशाही मांडली तेच आज छत्रपतींच्या भगव्याला आणि वाघनखांना विरोध करत आहेत. जगातील लोकांना मान्यता दिलेल्या वाघनख्यांबद्दल पितापुत्र चुकीचे बोलत आहे. माझा बाप चोरीला गेला असे म्हणतात. चिन्ह गेले, आमदार सोडून गेले तरी देखील वावटळीसारखे ओरडत फिरत आहेत. सरकारला बदनाम करत आहे, अशा खोटारड्या, रिकामटेकड्या भाषा पंडितांनी हे बंद केले पाहिजे. वाघनख्यांना पाहून मांजराच्या वाटेने जाणारे  शांत बसावे यासाठी ती वाघनखे आणली जाणार आहे, असे ढोबळे म्हणाले. 


काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?


शिवरायांनी वापरलेली वाघनखे परतावा म्हणून येणार आहेत की उसनवारीवर परत येणार आहेत?, असा  सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, वाघनखे परतावा म्हणून येणार आहेत की लोनवर येणार आहेत ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे. माझ्याकडे जो जीआर आहे त्यात लिहिलेले आहे की सदर वाघनखे तीन वर्षांसाठी उसनवारीवर देण्यात आलेली आहेत. यावर संबधित मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तसेच, शिवप्रेमींच्या भावनांशी खेळू नका, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. 


हे ही वाचा :


Kolhapur News : राज्य सरकारकडून शिवप्रेमींची दिशाभूल? इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या दाव्याने खळबळ