कोल्हापूर : भाजप-शिवसेनेचा भातुकलीचा खेळ सुरुच आहे. कधी कोण कोणाला गोंजारतं तर कधी कोण कोणाला डिवचतं. या वेळी पुन्हा एकदा भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न झाला आहे.
भाजप आणि शिवसेनेनं मिळून पुढील मुख्यमंत्री ठरवणं उचित होईल असं सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेना आणि भाजप एकत्र न आल्यास मतविभागणीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होण्याची भीतीही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं वक्तव्य केलं होतं.
शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, अशी घोषणा करुन शिवसैनिकांना सत्ता आणण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले.
आपला मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री होईल असे आम्हाला वाटते. खरे तर राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपा-शिवसेनेने एकत्रित येऊन ठरवले पाहिजे. शिवसेनेने त्यांचा मुख्यमंत्री होणार असा दावा करायचा दुसरीकडे आम्ही आमचा मुख्यमंत्री होणार असे म्हणायचे. यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभाजन होऊन फायदा होऊ नये हीच आमची इच्छा आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप-शिवसेनेने पुढील मुख्यमंत्री ठरवावा : चंद्रकांत पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2018 11:50 AM (IST)
शिवसेना आणि भाजप एकत्र न आल्यास मतविभागणीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होण्याची भीतीही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -