अहमदनगर : अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यानंतर आता भाजपचे आमदार राम शिंदे (  BJP Ram Shinde ) यांनी राष्ट्रवादीच्या रोहित पवारांवर ( Rohit Pawar ) निशाणा साधलाय. अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याआधी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते, रोहित पवारांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचं तिकीटही राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करून मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. आता राम शिंदे यांच्या आरोपावर रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.


Ram Shinde On Rohit Pawar : काय म्हणाले राम शिंदे?


भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवर आज टीका केली. ते म्हणाले की, आमदार रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या निवडणुकीचे तिकीट पक्षाला ब्लॅकमेल करूनच मिळवलं आहे. जिल्हा परिषदेचे तिकीट देता की मी भाजपात जाऊ अशी थेट धमकीच त्यांनी 2017 साली राष्ट्रवादी पक्षाला दिली होती. 


Rohit Pawar Election : 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मागितलं


आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टिका करताना सांगितलं की, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पावर यांनी डपसर मतदारसंघातून भाजपकडे तिकीट मागितलं होतं. रोहित पवार हे भाजपाच्या तिकिटासंदर्भात तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते. 


Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांएवढं मेरिट आहे का? 


अजित पवार हे गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात आहेत, रोहित पवारांकडे तेवढं मेरिट आणि क्षमता आहे का? असा सवाल राम शिंदे यांनी विचारला आहे. तर कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही असा खोचाक सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिला. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून रोहित पवारांवर जोरदार टीका सुरू आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका करताना ते कितीही जन्म घेवोत, त्यांना अजित पवार होता येणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, अजित पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. मला अजित पवारांसारखं व्हायचं नाही. मी राजकारणात नेता बनण्यासाठी आलो नाही तर विचार जपण्यासाठी आलोय. 


ही बातमी वाचा: