सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमातळावरून पुन्हा एकदा श्रेयवाद पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा येत्या 9 ऑक्टोबरला आहे. दोन दिवस शिल्लक असताना श्रेयवाद पुढे आला आहे. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याचं चित्र आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे.
Corona Vaccination: 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस लवकरच येईल का? फायझरने FDA कडे मागितली परवानगी
चिपी विमानतळ सुरू करण्यावरून शिवसेना व भाजप यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असतानाचं आता राणे समर्थकांकडून चिपी विमानतळाच्या बाहेर बॅनरच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. चिपी विमानतळाचे शिल्पकार नारायण राणेचं आहेत.अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. "दादा तुम्ही करून दाखवल", अशा प्रकारचे हे मोठ मोठे बॅनर राणे समर्थकांकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
कोकणात शक्तीप्रदर्शन केवळ नारायण राणेच करू शकतात. इतर कुणाचाही तो ध्यास नाही, असं म्हणत भाजपनं शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. वाघाच्या गुहेत येऊन कुणीही शक्तीप्रदर्शन करू नये, असं सांगत त्यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळ प्रकल्प आणला. राणे राज्यात सत्तेत असताना त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राणेंचा कुडाळ मालवण मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राणे सत्तेपासून दूर गेले. त्यानंतर आलेले शिवसेनेनेही हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळ बांधून पूर्ण होऊन 9 ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.