राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 27 Oct 2016 09:30 AM (IST)
पुणे: पुण्यासह पिंपरी-चिंचवड पालिकेत उद्घाटनावरुन भाजप-राष्ट्रवादीत रंगणाऱ्या कलगीतुऱ्यावर भाजप नवी खेळी करण्याच्या तयारीत आहे. कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याआधी पालकमंत्र्यांची परवानगी घ्यावी, अशा मागणीचं पत्र खुद्द पालकमंत्री गिरीश बापटांनी राज्य सरकारकडे पाठवलं आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांची परवानगी घेतली नाही तर कार्यक्रमाचा खर्च संयोजकांकडून वसुल करण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. दोन्ही पालिकांसह जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांसाठी हा नियम असावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.