BJP MP Brij Bhushan Sharan Singh on Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू न देण्याचा इशारा देणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याशी एबीपी माझानं एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. उत्तर भारतीयांची माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. बृजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं बृजभूषण यांनी म्हटलं आहे.


एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, उत्तर भारतीयांना अपमानित करणाऱ्या व्यक्तीला माफी नाही. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी, शाहूंची भूमी आहे. मराठ्यांनी देशासाठी पानिपतसारखे युद्ध लढले.  छत्रपती शिवाजींच्या सैन्यात प्रत्येक जातीचं सैन्य होतं. याच शिवाजी महाराजांच्या धर्तीवर राज ठाकरे नावाचा माणूस मराठी विरुद्ध उत्तर भारतीय राजकारण करतो. स्वस्त लोकप्रियतेसाठी गरीब टॅक्सी चालकांना मारतो‌. अशा व्यक्तिला मी माफ करणार नाही, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.  


बृजभूषण सिंह यांनी म्हटलं  की, उत्तर भारतीयांना 2007 पासून राज ठाकरे शिव्या देत होते आणि आता त्यांचं हृदय परिवर्तन झालं. माझी भूमिका ही पक्षाची भूमिका नाही ही माझी वैयक्तिक भूमिका आहे.  उत्तर भारतीय आहे आणि उत्तर भारतीयांना अपमानित करणाऱ्या व्यक्तीला मी माफ करणार नाही. यायचं असेल तर जरूर या. पण आधी उत्तर भारतीयांची माफी मागा. माफी न मागता न करता गाजावाजा करत याल तर घुसू देणार नाही हे पक्के आहे, असं ते म्हणाले. 


बृजभूषण सिंह यांनी म्हटलं  की, त्यांनी योगीजींची स्तुती करावी मोदींची स्तुती करावी. पण आधी उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहिजे. राज ठाकरे एका गुहेत राहतात ते अजून, आपल्या गुहेच्या बाहेर निघालेले नाहीत. त्यांनी निघावं आम्ही स्वागताला तयार आहोतच. त्यांची तयारी सुरू असेल तर आमची पण तयारी सुरू आहे त्यांची आधीपासून सुरू आहे. आमची कालपासून सुरू झाली. त्यांनी माघारीच जावं असं म्हणणं नाही. पण माफी मागावी मी स्वागताला येईल, असंही ते म्हणाले. हनुमानजी संजीवनी बुटी आणायला गेले होते तेव्हा एक राक्षस सुद्धा राम नामाचा जप करतच होता, असा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला बृजभूषण सिंह यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या


उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही : भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा