Dharashiv Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unsesonal Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं (Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसल्याचे पाहयाला मिळत आहे. धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावलीय. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी पाहणी केली आहे. 


धाराशिवच्या इर्ला गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली. पाटील हे बुलेटवरुन  शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पपईच्या बागेच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासमोर नुकसानीबाबतची व्यथा मांडली आहे. धाराशिव जिल्ह्यासह परिसरात अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याणुळं लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर येत असल्याचं पाहायला मिळालं. 


महत्वाच्या बातम्या:


Vidarbha Weather Update : विदर्भात उष्णतेचा कहर! अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद