Gopichand Padalkar : मी भाजपचा सर्वामासामान्य कार्यकर्ता आहे. मला जे सांगितले ते मी करतो. मला मंत्रीपद मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, मी नाराज असायचा प्रश्न नसल्याचे मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केले. पार्टीनं जे दिलं ते मला मान्य आहे. आता मी धनगर समाजासाठी पूर्णपणे काम करणार आहे. धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. पण मी देवाभाऊंच्या सोबत आहे. कार्यकर्त्यांनी याचं भान राखावं असेही पडळकर म्हणाले.
माझ्या चेहऱ्यावरुन तुम्हाला मी नाराज वाटत आहे का? असा सवाल देखील पडळकरांनी केला. मी संत बाळू मामा यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. इथे आल्यावर मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलतोय असे पडळकर म्हणाले. पक्षाने जे मला दिलं आहे, ते मान्य असल्याचेही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले. मारकडवाडीचं आंदोलन भोवल्याचा काही प्रश्न नाही असेही ते म्हणाले. मंत्रीमंडळ प्रश्न मला काही जास्त महत्त्वाचा वाटत नाही, त्यामुळे मी बोलणार नाही असेही पडळकर म्हणाले.
भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्यानं ओबीसी समाजात तीव्र संताप
छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत, ज्यावेळी ओबीसी समाजच विषय आला, तेव्हा कोणीच पुढे येत नव्हते पण भुजबळ हे पुढे आल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप आहे. पण तो माझ्या पार्टीचा विषय नसल्याचे पडळकर म्हणाले. राम शिंदे यांना जे पद मिळणार आहे त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही पडळकर म्हणाले. मी जी भूमिका घेऊन काम करतोय ती भूमिका मी अजिबात बदलणार नाही, विधीमंडळात नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे पडळकर म्हणाले. ज्यांच्या सोबत माझी दुश्मनी आहे त्यांच्या सोबत माझी दुश्मनी कायम राहील असेही पडळकर म्हणाले. देवा भाऊ आणि माझे वेगळे नाते आहे असेही पडळकर म्हणाले.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे
1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18.आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25 . संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27. प्रताप सरनाईक
28. भरतशेठ गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबीटकर
राज्यमंत्रीपदी कोणाची वर्णी
34. माधुरी मिसाळ
35. आशिष जैयस्वाल
36. पंकज भोयर
37. मेघना बोर्डीकर
38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम
महत्वाच्या बातम्या: