VIDEO: भाजप आमदार अनिल बोंडेंची तहसीलदाराला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 01 Oct 2016 09:01 PM (IST)
अमरावती: अमरावतीत भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी नायब तहसीलदाराला केलेल्या मारहाणीचा निषेध करत जिल्हा महसूल अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं. याप्रकरणी आमदार बोंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते आहे. सोमवारपर्यंत बोंडेंना अटक झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमरावतीचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना आमदार अनिल बोंडे यांनी शनिवारी संध्याकाळी मारहाण केली होती. संजय गांधी निराधार योजनेत त्रुटी असल्याचं कारण देत बोंडे यांचा काळेंशी वाद झाला. या वादात संतापलेल्या आमदारांनी थेट तहसिलदारांना मारहाण केली. मारहाणीची ही मोबाईल क्लीप सध्या व्हायरल झाली असून आमदाराविरोधात कारवाईची मागणी करण्यात येते आहे. VIDEO: