चंद्रपूर : वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. परंतु मी केवळ सविंधानातील तरतूद सांगितली असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या विविध आरोपांचे खंडण केले. तसेच आम्ही शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करु, असा दावादेखील त्यांनी यावेळी केला आहे.


वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रपती राजवटीबाबतचं वक्तव्य लोकशाहीविरोधी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसंच आता ईडीकडून चौकशीची नाही तर राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे, असा आरोपही केला होता. तर राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला होता. याविषयी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "राष्ट्रपती राजवटीबाबतचं विधान ही केवळ माहिती होती." "संविधानातील तरतूद सांगणं यात अडचण काय? त्याचा एवढा राग कशाला? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

शिवसेना-काँग्रेस एकत्र आली तरी सत्ता स्थापन होणार नाही : सुधीर मुनगंटीवार

मुनगंटीवार म्हणाले की, गेली पाच वर्ष मी, युती टिकून रहावी, दोन्ही पक्षातील नेत्यांची मनं जुळून राहावी, यासाठी प्रयत्न करत आलो आहे. माझी भाषा ही तोडणारी कधीच नाही. माझी भाषा ही दोन्ही पक्षांचे संबंध चांगले रहावे, यासाठी आहे.

कोणी गुरगुरायचं ठरवलं, तरी माझी हरकत नाही. मी वनमंत्री आहे. वाघांचं संवर्धन करणं आणि संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. वाघ गुरगुरतो म्हणून आपण वाघाला सोडून देत नाही. वाघाला सोबतचं घ्यायचं असतं, असे बोलून मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

पाहा काय म्हणाले मुनगंटीवार?



राष्ट्रपती राजवटीची भाषा करणं हा जनादेशाचा अपमान : संजय राऊत
शिवसेना-भाजपचं गोत्र सारखं
शिवसेनेची मनधरणी करण्याचा भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या फोनला मातोश्रीवरुन प्रतिसाद मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचं कळतं. याबद्दल सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "शिवसेनेच्या सहकारी मंत्र्यांसोबत माझी वैयक्तिक बातचीत होते. चर्चेतून, संवादातून प्रश्न मार्गी लागेल. शिवसेना आणि भाजपचं गोत्र सारखं आहे, स्वभाव सारखा आहे, त्यामुळे युती झाली आहे. शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करण्याचं आमच्या मनात आहे. जनादेशाचा सन्मान केला पाहिजे."

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा; हुसेन दलवाई यांचं सोनिया गांधींना पत्र

'सामना'तील टीकेचं उत्तर टीकने दिलं नाही!
स'सामना'मध्ये आमच्याबद्दल अतिशय वाईट भाषेत अग्रलेख लिहिले, पण आम्हीही राग मानायचं का? पण तो विचार केला नाही. राग मनात ठेवला असता तर कधीच युती झाली नसती. सामनातून केलेल्या टीकेचं कधीच टीकेने दिलं नाही. प्रेमाने सगळं जिंकता येतं, असं उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी 'सामना'तील टीकेवर दिलं.

महायुतीला सरकार स्थापन करावंच लागेल : सुधीर मुनगंटीवार