Sudhir Mungantiwar Majha Maharashtra Majha Vision 2023: ''साल 2000 पासून साल 2022 पर्यंत प्रदूषणाच्या मृत्यूमध्ये 300 पट वाढ झाली आहे. हा चिंतेचा विषय आहे. यावर आज लक्ष दिल नाही, तर आपण ताटात जितकं अन्न घेतो, तितकंच आपल्याला औषध खावं लागेल, अशी अवस्था दूर नाही, म्हणून राज्यामध्ये या दृष्टितिकोणातून काम करत असताना आमचं चार वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आलं. पोलंडमध्ये देखील या संदर्भात चर्चा झाली तेव्हा आमचं कौतुक झालं.'', असं सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलं आहे.  


Sudhir Mungantiwar Majha Maharashtra Majha Vision 2023: '193 देशांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 36 व्या क्रमांकावर'
 
मुनगंटीवार यांच्याकडे असलेल्या सांस्कृतिक विभागाच्या व्हिजनवर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''कोणता देश किती धनसंपन्न आहे, त्यापेक्षा तो किती गुणसंपन्न आहे, यावर आता मूल्यांकन केलं जात. संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा दरडोई उत्पन्न किंवा जीडीपी याच्या बाहेर जाऊन हॅप्पीनेस इंडेक्सवर निष्कर्ष ठरवते की, तो देश आनंदी किती आहे. यामुळेच आमच्या विभागाने काही निर्णय केले. मी जेव्हा अर्थ मंत्री होतो तेव्हा जगातल्या 193 देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कितव्या नंबरवर आहे, याचा अभ्यास करण्यास सांगितला. त्या अभ्यासातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 36 व्या क्रमांकावर होते.'' ते म्हणाले,  सांस्कृतिक विभागाचा मी वारसा पाहत आहे, जर याचा शात्रशुद्ध अभ्यास केला तर मी अभिमानाने सांगू शकतो, जगातल्या टॉप 10 देशात हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असेल.''  


Sudhir Mungantiwar Majha Maharashtra Majha Vision 2023: महाराष्ट्रातील हॅकरनेच ठाकरेंचा ब्रेन हॅक केला: मुनगंटीवार


या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि तुमचे संबंध कसे आहेत, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, ''एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कधी संवाद झाला नाही. मात्र ऑक्टोबर 2021 मध्ये मी त्यांना खूप याबद्दल सजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न खुर्ची किंवा मुख्यमंत्रीपदाचा नाही, आपले देशामध्ये आज ज्या पद्धतीचं द्वेषाचे वातारण आहे. ही चिंतेची बाब आहे. खुर्चीपेक्षा देश मोठा आहे. खूपवेळा आम्ही चर्चा केली. मात्र माझ्या असं लक्षात आलं की, त्यांच्यात आता काही बदल होईल, असं वातावरण आता शिल्लक राहिलं नाही. जसं आपण म्हणतो माझा कॉम्प्युटर हॅक झाला, तर त्यांचं ब्रेन हॅक केलं होत.'' ते म्हणाले, हॅकर कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. हे हॅकर महाराष्ट्रातीलच आहेत.