औरंगाबाद :  भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा ( Jp Nadda) यांची आज औरंगाबाद येथे सभा पार पडली. परंतु, या सभेला भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde ) आणि त्यांच्या भगिणी खासदार प्रितम मुंडे यांना निमंत्रण न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आहे. निमंत्रण नसतानाही पंकजा मुंडे कार्यक्रमाला गेल्या. परंतु, त्यांना व्यासपीठावर बोलण्यासाठी फक्त दोनच मिनीट वेळ देण्यात आला. या दोन  मिनिटांमध्येही पंकजा मुंडे यांनी अवघ्या एका मिनिटात आपले भाषण संपवले. त्यामुळे त्या खरच नाराज आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु, आपण नाराज नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज सकाळी चंद्रपूर येथे नड्डांची  सभा पार पडली. त्यानंतर औरंगाबदमध्ये त्यांची सभा पार पडली. ही सभा आधीपासूनच चर्चेत होती.  कारण मराठवाड्यातील महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तरीही पंकजा मुंडेंनी कार्यक्रमाला हजेरी लावली. याच सभेत पंकडा मुंडेंना केवळ दोन मिनीट बोलण्यास सुत्रसंचालकांनी सांगितलं. तर पंकजा मुंडेंनी एका मिनिटात आपलं भाषण आटपून व्यासपीठावर परतल्या. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना जास्तच उधाण आले.  


जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधील सभेला उशीर झाला म्हणून पंकजा मुंडे यांना बोलण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्षांना जास्त वेळ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी अत्यंत छोटं भाषण केलं. पक्षाचा आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या भाषणात पंकजा मुंडे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तसंच भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन करत आपलं भाषण संपवलं.


निमंत्रण पत्रिकेत मुंडे भगिणींची नावे नसल्याने त्या आधीच नाराज आहेत अशा चर्चा आहेत. परंतु, आपन नाराज नसल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्षाचे अध्यक्ष आल्याने सभेला येणं माझं कर्तव्य आहे. त्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. प्रोटोकॉलप्रमाणे स्टेजवर माझी खुर्ची राखून ठेवण्यात आली होती. आम्ही नाराज आहोत या चर्चांना काही अर्थ नाही. 


महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ; गृह खात्याचे आदेश