Palghar Latest News : एका मृत्यू पावलेल्या चिमुकल्याला दवाखान्याची रुग्णवाहिका न मिळाल्याने 35 ते 40 किमी अंतरावर कडाक्याच्या थंडीत बाईकवरून मृत्यदेह न्यावा लागल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणावरुन भाजपने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही घटना अतिशय लज्जास्पद आहे. विशिष्ट कंपन्यांना मदतीसाठी सुपर मार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे. पालघर जिल्ह्यात गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला काय घडले पहा. रुग्णवाहिका नसल्याने दुर्दैवी पित्याला 6 वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून न्यावा लागला, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका चिमुकल्याचा तापानं मृत्यू होतो, नि पैसे नाहीत तर मृतदेह पायी घेऊन जा असं सांगत हॉस्पिटलकडून ॲम्ब्युलन्स नाकारली जाते. ही निर्दयता दाखवलीय शासकीय जव्हार कुटीर रुग्णालयानं. या प्रकरणात 2 ॲम्ब्युलन्स चालकांचं निलंबन झालंय पण हॉस्पिटलवरही कारवाई करा तरच अशी दांभिकता थांबेल असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
नेमकं प्रकरण काय
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला एका मृत्यू पावलेल्या चिमुकल्याला दवाखान्याची रुग्णवाहिका न मिळाल्याने 35 ते 40 किमी अंतरावर कडाक्याच्या थंडीत कुडकुडत बाईकवरून मृत्यदेह न्यावा लागल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे. पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी वय 6 वर्ष ह्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर आई-वडिलांनी उपचारासाठी त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात चिमुकल्याला दाखल केलं. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णलयात घेऊन गेले. परंतु तेथील डॉ जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच जव्हार कुटीर रुग्णलयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान 25 तारखेला रात्री 9:00 वाजता कुटीर रुग्णालयात चिमुकल्याचा मृत्यू झाला.
परंतु आर्थिक चनचनीत अडकलेल्या या कुटूंबाला मृत्युदेह आता घरी न्यायचा कसा? असा प्रश्न उभा ठाकला? यावेळी त्यांनी रुग्णवाहीकेसाठी विचारणा केली असता पैस देणार असाल तरच गाडी मिळेल. अशी तंबीच रुग्ण चालकांनी कुटूंबियांना दिली, असल्याचे मृत्यू झालेल्या अजयचे वडील युवराज पारधी यांनी सांगितले. तसेच पैसे नसतील तर पायीपायी मृत्युदेह घेऊन जा, असेही त्यांना यावेळी सांगण्यात आले. परंतु पैसे द्यायला नसल्याने हताश होऊन थंडीत कुडकुडत 35 ते 40 किमी अंतरावर बाईकवर मृतदेह घेऊन गावी पायरवाडीत येथे आले. ही दुर्दैवी घटना प्रशासनाच्या कारभारावर चीड आणणारी असून, या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: