मुंबई : राज्य सरकारने काल राजभवन येथे जाऊन विधानपरिषदेसाठी 12 जणांच्या नावांची शिफारस दिली. त्यानंतर आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यांची यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळांना अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र ही भेट अनौपचारिक होती असं चंद्रकातं पाटील यांनी सांगितलं.

आज सकाळी साडेदहा वाजता चद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. जवळपास 45 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र ही अनौपचारिक भेट होती. या भेटीदरम्यान विधानपरिषदेबाबत चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यपालांची भेट घेणे टाळले होते. गेल्या आठवड्यात आमची भेट ठरली मात्र काही कामानिमित्त ते गोव्याला गेल्याने भेट टळली. राज्यपालांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती, भाजप कार्यकर्त्यांचे मृत्यू याबाबत विचारणा केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला सांगितले.

कालच महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली.

महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली 12 नावे

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार) राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा) यशपाल भिंगे (साहित्य) आनंद शिंदे (कला)

काँग्रेस

रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार) सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार) मुझफ्फर हुसेन (समाजसेवा) अनिरुद्ध वनकर (कला)

शिवसेना

उर्मिला मातोंडकर (कला) नितीन बानगुडे पाटील विजय करंजकर चंद्रकांत रघुवंशी

Chandrakant Patil meets Governor | चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट, सदिच्छा भेट असल्याची माहिती