Chandrakant Patil : महाविकास आघाडीतील बेबनावाचा फायदा भाजपला होईल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. अपक्षांना स्वत: चं मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील असेही पाटील म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या निवडणुीत देखील भाजपला 11 मतांची गरज होती. ती कशी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ती मतं मिळाली, आमचा उमेदवार विजयी झाला असेही पाटील म्हणाले.


महाविकास आघाडीत बेबनाव आहे, त्याचा फायदा भाजपला होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना बेबनाव थांबवता आला नाही, असेही पाटील म्हणाले. संजय राऊत हे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्षांवर तुटून पडले आहेत. अपक्षांना स्वत: चं मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील असे पाटील म्हणाले. अडीच वर्ष अपक्षांनी साथ दिली मग ते चांगला आणि एका निवडणुकीत त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणं मतदान केलं असेल तर त्यांना बघून घेऊ असं म्हणंण चुकीचं असल्याचे पाटील म्हणाले.


मूळ सैन्य भरती बंद होणार नाही


मोदी सरकारनं अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या माध्यमातून 10 लाख तरुणांना नोकरी मिळणार आहे. या घोषणेनं काँग्रेसची झोप उडाली असल्याचे पाटील म्हणाले. अग्निपथची भरती होत असताना मूळ सैन्य भरती बंद होणार नाही असेही पाटील म्हणाले. हजारो रोजगार निर्माण होत असताना विरोध करणं चुकीचं आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु असलेलं आंदोलन हे निर्माण केलेलं आंदोलन असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. बेरोजगारी संपवण्यासाठी मोदींनी संकल्प केला आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुण भाजपडे वळणार असल्याच्या भिती काँग्रेसला वाटत असल्याचे पाटील म्हणाले.


तरुणांना भडकण्याचा प्रयत्न सुरु 


लोकशाहीत आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, लोकशाही मार्गाचा अवलंब करायला हवा असेही पाटील म्हणाले. सध्या देशात जो हिंसाचार चालला आहे ते चुकीचं आहे. देशाची संपत्ती जाळणं चुकीचं आहे. तरुणांना भडकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. 


      महत्वाच्या बातम्या :