Maharashtra SSC Result 2022 : शिकण्यासाठी तुमचं वय नाही तर लागते ती जिद्द आणि चिकाटी. याच जिद्दीनं वयाच्या 53 व्या वर्षी वरळीत राहणाऱ्या कल्पना कोल्हेटकर (Kalpana Kolhetkar) यांनी आपलं दहावी पास होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्या फक्त दहावी उत्तीर्ण झाल्या नाहीत, तर त्या विशेष प्राविण्य मिळवलं आहे. कोल्हेटकर यांनी 79.60 टक्के गुण मिळवत हे घवघवीत यश संपादन केलं आहे. कल्पना कोल्हेटकर यांना आपल्या मुलांनी व कुटुंबातील सदस्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहित केल्यानं त्यांना हे यश मिळवता आलं, असल्याची त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
तबब्ल तीस वर्षानंतर दहावीची परीक्षा दिली
कल्पना कोल्हेटकर यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. मात्र, मिल कामगारांच्या संपावेळी त्यांना मुंबई सोडावी लागली आणि त्या अलिबागला आपल्या कुटुंबियांसोबत राहायला गेल्या. त्यात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली आणि त्यांचे शिक्षण अर्धवट त्यांना सोडावं लागलं. मात्र, शिक्षणाची जिद्द कायम त्यांच्या मनात होती. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं. त्यांचा एक मुलगा परदेशात आयटी इंजिनिअर असून दुसरा मुलगा आंतरराष्ट्रीय रेसलर आहे. या दोन्ही मुलांनी आपल्या आईला तू पुन्हा एकदा शिकावं, असं म्हणत शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं आणि तबब्ल तीस वर्षानंतर कल्पना यांनी दहावीची परीक्षा दिली.
दहावीची परीक्षा मार्चमध्ये असताना फेब्रुवारीमध्ये मोठ्या मुलाचं लग्न ठरलं. त्यामुळं एकीकडं मुलाच्या लग्नाची तयारी तर दुसरीकडे दहावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी, अशी तारेवरची दुहेरी कसरत आईला करावी लागली. मात्र, यामध्ये सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत त्या चांगले गुण मिळवत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या. वरळीच्या आदर्शनगर रात्र शाळेत त्यांनी दहावीच शिक्षण सुरु केलं होतं. आता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढेसुद्धा त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात राहायचं आहे. पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. शिवाय, इतरांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन या प्रवाहात आणण्याचं काम त्यांना पुढील जीवनात करायचा आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra SSC 10th Result 2022 :अजब निकालाची गजब गोष्ट! पुण्याचं पोरगं काठावर पास; सगळ्या विषयात 35 मार्क
- Maharashtra SSC Result 2022: काही काठावर पास तर काहींना 100 टक्के; राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI