Anil Bonde : राणा दाम्पत्यांनीआख्खी शिवसेना कामाला लावली असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. शिवसेनाच हे प्रकरण वाढवत आहे. सगळ्यांनी मिळून हनुमान चालीसा वाचायला पाहिजे असे बोंडे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रवी राणा हे सर्व हिंदू आहेत. मग सगळ्यांनी मिळून हनुमान चालिसा वाचण्याचा मातोश्रीवर महोत्सव करायला काय हरकत आहे असे बोंडे यावेळी म्हणाले.


उगीचच धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्याचा शिवसेना प्रयत्न करत आहे. त्याची फळे त्यांनी भोगावी लागतील असे बोंडे म्हणाले. राणा दाम्पत्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत करायला हवे. कारण ते हिंदू धर्मात जागृती निर्माण करण्याचे काम करत आहेत. हनुमान चालीसाचा प्रचार करण्याचे काम जर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले असते तर संपूर्ण भारतात त्याचा मेसेज गेला असता असेही बोंडे यावेळी म्हणाले.


दरम्यान, शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतोय तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असे आमदार रवी राणा यांनी पेसबुक लाईव्ह करत सांगितले आहे. हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहे. आम्हाला कोणी रोखू नये असे रवी राणा म्हणाले. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले पाहिजे. आता बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं असे रवी राणा म्हणाले. पोलीस आम्हाला रोखत आहेत, तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही यावेळी रवी राणा यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हनुमान चालीसाला विरोध करत असल्याचे ते म्हणाले. शिवसैनिक गुंडगर्दी करत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर जात आहे. मी त्याठिकाणी महाराष्ट्राच्या शांततेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जात असल्याचे राणा यांनी सांगितले.


मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याच्या मुद्यावर सध्या चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. राणा दाम्पत्य आज सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर जाणार होते, मात्र, अद्याप ते घराच्या बाहेर पडले नाहीत. त्यांच्या घराच्या बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. राणा दाम्पत्यांना बाहेर येण्याचे शिवसैनिकांकडू आवाहन केले जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: