Devendra fadnavis on Shiv sena : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेहण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे कुणीही शिवसेनेवर खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकणार नाहीत. 


शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे, तीच खरी शिवसेना ठरणार आहे. हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. आज निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णायावर शिक्कामोर्तब होता. आम्हाला याचा विश्वास होता. याचं कारण, यापूर्वीच्या सर्व निर्णायमध्ये निवडणूक आयोगानं पक्षातील फुटीवर असेच निर्णय दिले आहेत. आमदार आणि खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेला आहे. कारण, एखादा पक्ष मतदारांच्या आधारावर असते, तो आमदार खासदारांवर असते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 






 


उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का


एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. 


आणखी वाचा :
Shiv Sena Party: एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का