किशोर जाधव या पोलिसानं दारूच्या नशेत लॉच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप तिवारी यांचा आहे. याबाबत जाब विचारायला गेले असता पोलिसांनी देखील किशोर जाधव यांचीच बाजू घेतली. त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या वादात तिवारी यांनी शिवीगाळ केली.
दयाशंकर तिवारी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भाजप हा पार्टी विथ डिफरन्स वरून पार्टी विथ शिवराळ नेत्यांचा पक्ष आहे का असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
VIDEO :
भाजप आमदार अमित साटम यांची फेरीवाल्यांना शिवीगाळ
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आमदार अमित साटम पोलिस आणि फेरीवाल्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. जुहूतल्या मिठीबाई कॉलेजजवळील रस्त्यावर अनधिकृत फेरिवाले अतिक्रमण करत असल्याचा अमित साटम यांनी आरोप केला होता.
फेरीवाल्यांनी मात्र अमित साटम आपल्याकडून हप्त्यांची मागणी करत असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे आमदार साटम हे पोलिसांशी देखील आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. ही संपूर्ण घटना 7 सप्टेंबर रोजी घडली होती.