नंदुरबार : गुजरातमधील अहमदाबाद येथे चिनी कोंबड्यांना H5 N1 या बर्डफ्लूची लागण झाल्याची पुष्टी भोपाळमधील प्रयोगशाळेने दिल्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा सीमावर्ती भागातील नवापूर येथे शासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाय योजना सुरु केल्या आहेत.
नवापूर परिसरात 29 पोल्ट्रीमध्ये असलेल्या 9 लाख पक्षाची पशु संवर्धन विभाग मार्फत तपसणी केली जात खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.
नवापूर तालुक्यात 2006 मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर प्रशासन कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज होते. आता गुजरात राज्यातील अहमदाबाद परिसरात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जवळपास सर्वच 29 पोट्री मधील 9 लाख पक्ष्याची तपासणी करून नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन नवापुर येथे 52 पोल्ट्री अधिकृत आहेत. सद्यस्थितीत 29 पोल्ट्री सुरु असून त्यात 9 लाख पक्षी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारी घेतली जात असून, सर्व पोल्ट्री मालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन टीम रोज पक्ष्यांची तपासणी करत आहेत.
अहमदाबाद येथे चिनी कोंबड्यांना H5 N1 या बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर तात्काळ यंत्रणा कार्यरत झाली. आजवर 70% तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या 3 दिवसात त्याही पूर्ण होतील. कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितिला तोड देण्यास प्रशासन तयार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांनी दिली.