Latur District Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी 18 जागेवर काँग्रेस प्रणित सहकार पॅनलच्या उमेदवारांचा विजय झालाय. यामुळं पुन्हा एकदा दिलीपराव देशमुख यांच्या ताब्यात बँकेची सूत्रे आली आहेत. बँकेच्या स्थापनेपासूनच या बँकेवर दिलीपराव देशमुख यांचं वर्चस्व राहिलंय. भाजपानं यावेळी मोठी शक्ती पणाला लावली होती. मात्र, मतदारांनी भाजपाला नाकारलंय. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय.


या निवडणुकीत भाजपानं जोर लावला. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडलीय. त्यांना चिठ्ठीवर एक जागा मिळालीय. देवणी तालुका सोसायटी मतदार संघातून सहकार पॅनलचे उमेदवार गोविंद भोपनिकर आणि भाजपा प्रणित विरोधी पक्षाचे उमेदवार भगवान पाटील तळेगावकर या दोघांना प्रत्येकी 17 मते समान पडली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी या दोघांच्या नावाची चिठ्ठी काढली. त्यात भगवान पाटील तळेगावकर हे चिठ्ठीवर विजयी झाले.


19 पैकी 10 जागा बिनविरोध


बँकेतील 19 जागेपैकी 10 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळं निकला पूर्वीच कोण जिंकणार? हे आधीच स्पष्ठ झालं होतं. दरम्यान, 9 जागांवर मतदान झालं. यात भाजपाचे उमेदवार प्रथम पासूनच बकफूट वर राहिले आणि सहकार पॅनलचा विजय झाला.


लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  इतिहास


लातूर जिल्ह्याची निर्मित झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातून बँकेचे ही विभाजन झाले. पुढील काही वर्ष बोर्डाने बँकेचे कामकाज पाहिले. 1987 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात बँकेच्या 19 जागेवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. या बँकेच्या स्थापनेपासूनच या बँकेवर दिलीपराव देशमुख यांचं वर्चस्व राहिलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-