Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. मागील 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम असल्याचे पाहायला मिळत आहे. आज देशात सर्वाधिक तापमानाची नोदं चंद्रपुरात झाली आहे. चंद्रपुरात सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. काल देखील नागपुरात देशात सर्वाधिक तापमानाची नोंद होती.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रमुख शहरांमधील तापमान 44 अंशांच्या पार गेलं आहे. अमरावतीत तापमानाचा पारा 44.4 अंशावर गेला आहे. तसेच अकोला 44.3, नागपूर आणि वर्धा 44 अंश सेल्सिअस तापमान होते. ब्रह्मपुरीतही तापमानात वाढ झाली आहे. तापमान 44.4 अंश सेल्सिअसवर गेले आहे. यवतमाळ देखील तापलं आहे. यवतमाळमध्ये कमाल तापमान 43.6 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. सोबतच, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान चाळीशी पार केली आहे.
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
पारभणी 42.4पुणे 38.7बीड 42.3चिकलठाणा 41.6बारामती 40.2सातारा 39.9सोलापूर 43उदगीर 40.8जेऊर 42सांगली 38.7धाराशिव 41.8जळगाव 41जेऊर 42मालेगाव 42.8
विदर्भातील 11 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त
विदर्भात आज 44.6 एवढ्या तापमानासह चंद्रपुरात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. विशेष बाब म्हणजे आज विदर्भातील 11 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होते. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती या पाच जिल्ह्यात आज तापमानाचा पारा 44 अंशाच्या वर नोंदवला गेला आहे.
तापमान वाढीमुळे दाट जंगलातील पानवठे आटले
उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढीमुळे दाट जंगलातील पानवठे आटले आहेत आणि त्यामुळे दाट जंगलातील हिंस्र प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील आंबाबारवा अभयारण्यातील हिंस्र प्राणी आता पर्यटकांना ही सहज दिसू लागले आहेत. आंबा बरवा अभयारण्यात सध्या 18 वाघ असून अस्वल,रानगवे हे सुद्धा सहज आता दिसायला लागले आहेत. दररोज पर्यटक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात एरवी न दिसणाऱ्या या हिंस्र प्राण्याच्या छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आहेत. तर एका पर्यटकांनी साळीदर (Porcupine) या प्राण्याचे शिकार करताना वाघाला आपल्या कॅमेरात कैद केला आहे.
महत्वाच्या बातम्या: