ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2025 | रविवार 

1. सोलापूरचे न्यूरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच रूग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी, सुसाईड नोटमधील नोंदीनुसार कारवाई https://tinyurl.com/269h2k35  आर्थिक व्यवहार अन् कामावरून काढल्यानंतर डॉ. वळसंगकरांना महिला कर्मचाऱ्याकडून धमकी, नेमकं काय घडलं? नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/yn2bjuw3  ज्यांना शिकवून अधिकारी केलं, चांगला पगार देतोय, त्यांनीच माझ्यावर घाणेरडे आरोप करुन धमकावले, डॉ. वळसंगकर यांची सुसाईड नोट समोर https://tinyurl.com/mpd7vuaj 

2. महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच, संजय राऊतांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी युतीसाठी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट  https://tinyurl.com/4tjrt3u6  भोंग्याविरोधी आंदोलनात 17 हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल, 2017 मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप https://tinyurl.com/vjhp2z4v 

3. बडतर्फ पोलिस निरीक्षक रणजीत कासलेला निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती, बीड प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर https://tinyurl.com/yf4rf97z  रणजीत कासलेच्या मुलांच्या फीसाठी त्यांच्या अकाऊंटवर 10 लाख पाठवले, बीडमधील बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीचा दावा https://tinyurl.com/y6n62tva  धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रणजीत कासलेवर तिसरा गुन्हा दाखल, व्यापाऱ्याकडून सहा लाख घेतल्याचा आरोप https://tinyurl.com/33zn79nu 

4. विधानसभेआधी मी राजीनामा दिला होता, पण अजित पवारांनी तो स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचा दावा https://tinyurl.com/mwf2e8rw  समीर भुजबळ हा अजित पवारांकडून पक्षातून हाकललेला माणूस, त्यांची कीव येते, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंची घणाघाती टीका https://tinyurl.com/4xedk6u7  नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ जर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते निवडून आले असते, छगन भुजबळांचं वक्तव्य https://tinyurl.com/5n8nmyvx 

5. तीन टर्म निवडून आल्यानंतरही पक्षाने संधी दिली नाही, सत्ता असताना कामंही केली नाहीत, काँग्रेसचा हात सोडणाऱ्या संग्राम थोपटेंची खदखद, 22 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार https://tinyurl.com/mpc7dcns  वडील 14 वर्ष मंत्री, 6 वेळा आमदार अन् स्वत:ही 3 वेळेस आमदारकी मिळवली, आता काँग्रेस सोडून भाजपात जाणार, कोण आहेत संग्राम थोपटे? https://tinyurl.com/454fk3we 

6. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रूग्णालयंही पोलिसांच्या रडारवर https://tinyurl.com/3ryw2ka9 

7. विदर्भात तापमानाचा भडका, उपराजधानी नागपुरात 44.7 अंश, परभणीत 43.6 अंश तापमानाची नोंद, तर कोकण आणि मुंबईत उकाड्याने नागरिक हैराण https://tinyurl.com/475sdft6 

8. मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्थळ, स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी, जुनं फर्निचर या चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड https://tinyurl.com/nhz2fjew 

9. जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार; पूर आणि भूस्खलनात सरकारी शाळा, रस्ते, घरे वाहून गेली, हायवे चिखलाने माखला, तीन जणांचा मृत्यू, 100 जणांना वाचवण्यात यश https://tinyurl.com/bddtxaj4  

10. पंजाबने बंगळुरूला दिले 158 धावांचे लक्ष्य, कर्णधार श्रेयस अय्यर अपयशी, आरसीबीच्या सुयश शर्मा आणि कृणाल पांड्याची गोलंदाजीत कमाल https://tinyurl.com/muut9ma9  वानखेडेवर आज पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जची लढत, होमपीचवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला फायदा, तर आरबीसी विरूद्ध पंजाब सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांना करावी लागणार शिकस्त https://tinyurl.com/wx8yz4h2 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w