कोल्हापूर : कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीच्या अपुऱ्या जागेवरुन सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तिरडी मोर्चा काढला. यामुळे महापालिका परिसरात एकच गोंधळ उडाला.
रविवारी स्मशानभूमीत रक्षाविसर्जनासाठी जागाच नसल्यानं दोन मृतदेहांना घेऊन नातेवाईकांना अक्षरश: रस्त्यावर वाट पाहावी लागली. त्यामुळे आक्रमक नगरसेवकांनी थेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलन केले.
दरम्यान, या गोंधळानंतर समस्येवर कसा तोडगा निघतो याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचांगंगा स्मशान भूमीचा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सभेत सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून तिरडी मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Nov 2017 11:21 PM (IST)
कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीच्या अपुऱ्या जागेवरुन सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तिरडी मोर्चा काढला. यामुळे महापालिका परिसरात एकच गोंधळ उडाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -