भिवंडीत कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 02:40 AM (IST)
कल्याण : कारवरील नियंत्रण सुटून टेम्पोला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी बायपास रस्त्यावर हा अपघात घडला. अपघातग्रस्त कार भिवंडीतील केदारे कुटुंबीयांची असून या मारुती एस्टीम कारमधून ते संगमनेरवरुन भिवंडीला परतत होते. त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचा चेंदामेदा झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले आहेत.