Bhaskar Jadhav : एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)  बाजूला करण्याचं भाजपने (ऱझ)  ठरवलं आहे. मात्र एकनाथ शिंदे भाजपच्या दबावाखाली येतील असं वाटतं नाही. भाजपला जिथे गरज असेल तिथे मित्र पक्षांना जवळ घेतात, भाजपची ताकद असेल तिथे मात्र माझं ते माझं आणि तुझं ते माझं अशी भाजपची सवय असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav) यांनी केली. सरकारकडे पाशवी बहुमत आहे, तरीदेखील ते मला विरोधी पक्षनेते बनवायला घाबरतात. हा कोकणी माणसांचा सन्मान असल्याचे भाल्कर जाधव म्हणाले.

Continues below advertisement

आपण देत असलेल्या उमेदवाराबाबत समाजात काय स्थान आहे हे पहाव लागतं

जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात. आपण देत असलेल्या उमेदवाराबाबत समाजात काय स्थान आहे हे पहाव लागत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. ते सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना जाहीर मार्गदर्शन केलं त्यावेळी बोलत होते.

इटलीत बंद पाडलेली विषारी परमानेंट केमिकल' हे रसायन रत्नागिरीतील लोटे MIDC मध्ये बनवलं जातं असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. हे लोकांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिली, पण स्थानिक लोक आणि पर्यावरण तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. यावर बोलताना गेले चार सहा दिवस या प्रकल्पाबद्दल एक क्लिप फिरतेय. या प्रकल्पाबाबत सत्यता काय आहे, हे पडताळून पाहत आहे. तशा प्रकारे स्थिती असेल तर सर्वांनी आवाज उठवला पाहिजे असे मत देखील भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. वैभव नाईक यांना एसीबी ने नोटीस दिली होती, याबाबत एक सभा घेतली होती. कोर्टात केस आली होतो. त्यामुळे वैभव नाईक यांनी आम्हाला सभेला बोलावलं, त्याचा फायदा उद्याच्या निवडणुका होईल असेही भास्कर जाधव म्हणाले.  

Continues below advertisement

विनायक राऊत नाराज आहेत की खुश आहेत याबाबत माहिती नाही

विनायक राऊत नाराज आहेत की खुश आहेत याबाबत माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन सांगतो, असा टोला देखील भास्कर जाधव यांनी लगावला. शहर विकास आघाडी करुन सत्ताधारी पक्षातील लोक आमच्या सोबत आघाडी करायला येतात. त्यामुळे काहीतरी चुकीचं घडत असताना समान धागा घेऊन एकत्र येत असतील असं दिसत असल्याचे जाधव म्हणाले. राष्ट्रवादीत असताना तीन नगरपालिका जिंकल्या, यावेळी संपर्कमंत्री पदावरून हटवलं, त्यावेळी गमतीने त्या पक्षाने मला मंत्री केलं असल्याचं म्हटलं होतं. राणे बंधूवर काही बोलणार नाही असेही जाधव म्हणाले.