रत्नागिरी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्यामुळे पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन घेतला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोकणातील अनेक चाकरमाने काम करतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. देशातील महामार्गावरील जिल्हाअंतर्गत सीमाही बंद करून येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतूकीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.



शिमगोत्सवात मोठ्या प्रमाणावर कोकणात चाकरमानी दाखल होतात. मात्र, लॉकडाऊमुळे आता कुणाची आई; तर कुणाचे भाऊ कामानिमित्त मुंबईला गेल्याने ते गावी परतण्याचे मार्गही बंद झालेत. अशा वेळेस भास्कर जाधव यांनी सरकारकडे मागणी केली आहे. माझ्या कोकणातील रोजीरोटी निमित्त मुंबई गेलेले चाकरमानी कोकणात परत येण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. मुंबईत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक रोजीरोटीच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्यांच्यात कोकणातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबईमधली आजची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपासूनच मी सांगत आलोय कोकणातील लोकांना कोकणामध्ये येउद्या. तीथे गावामध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येइल. अजूनही वेळ गेलेली नाही, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.


केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट


तपासणी करुन कोकणवासीयांना घरी सोडा
राज्य सरकारने एसटी पाठवून या चाकरमान्यांना त्यांच्या घरी पोहचावे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसाठी एका बसमध्ये केवळ 30 प्रवासी आणावे. या नागरिकांच्या कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना त्यांच्या घरी सोडवावे. जर, घरामध्ये जाण्याची सरकारची परवानगी नसेल तर शाळेत त्यांना क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात येईल. एसटीने यांना कोकणात आणलं तर त्यांची तपासणी करणे सोपं होईल. मात्र, खासगी वाहनांनी आणलं तर त्यांच्यावर नियंत्रण करणं अवघड असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. ज्या ठिकाणाहून हे प्रवासी निघतील तिथे यांची तपासणी करण्यात येईल आणि ती एसटी ज्या गावातील असेल त्याच्या सीमेवर थांबून त्यांची तपासणी आपण करुया. हे सहज सोपे होइल. आजही कोरोना वाढण्याची भिती वाढत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणातील लोकांना कोकणात येउद्या, अशी मागणी माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.


Amit Deshmukh | कोरानाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग कोणती पावलं उचलतोय? वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी बातचीत