मुंबई : शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार नाहीत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. शरद पवार जरी सहभागी होणार नसले तरी इतर काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.  प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत. 


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली होती.  परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत. शरद पवार सहभागी होणार नसले तरी राष्ट्रवादीकडून दिग्गजांची फळी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.  राष्ट्रवादीचे नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.  तर राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे बुलढाणा आणि हिंगोली येथे रोहित पवार सहभागी होणार आहेत. 


 तर उद्याच्या राहुल गांधी यांच्या सभेला शिवसेनेकडून आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती अशोक चव्हाणांनी दिली आहे.  आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेसाठी जाण्यासाठी उत्सुक देखील आहेत. त्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे.  सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न्युमोनिया झाल्यामुळे छातीत मोठया प्रमाणत संसर्ग झाला आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिराला  सहभागी झाले होते. मात्र चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. शिबिरात देखील पवार यांनी फक्त  पाच मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. 


राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14  दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. उद्या (9 नोव्हेंबर) नांदेडमध्ये राहुल गांधी यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रा 3 हजार 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. ज्यामध्ये उद्या या यात्रेचे अर्धे अंतर पूर्ण होणार असल्याचे जयराम रमेश म्हणाले. 


संबंधित बातम्या :


Bharat Jodo Yatra : भाजपकडून भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न, पण...पाहा नेमकं काय म्हणाले जयराम रमेश