Bharat Jodo Yatra Live Updates : भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील पाचवा दिवस; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला मनसेनं विरोध केला आहे.

abp majha web team Last Updated: 19 Nov 2022 12:18 PM

पार्श्वभूमी

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Live Updates : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 73 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 13 वा दिवस...More

Bharat Jodo Yatra Dhule : भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर रॅलीचं आयोजन
खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून रॅली काढण्यात आली. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी जात आहे महाराष्ट्रात गेल्या 13 दिवसांपासून आलेल्या या यात्रेला कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं. या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि समविचारी पक्षांच्या वतीने धुळे शहरातून आज रॅली काढण्यात आली. शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली महात्मा गांधी पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.